Prashant Jagtap On Ajit Pawar | प्रशांत जगतापांची ‘ती’ पोस्ट व्हायरल, सांगा काय चुकल तीचं? भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Prashant Jagtap On Ajit Pawar | बापावर हल्ला करण्यासाठी भावाला हाताशी धरून महाशक्ती चालून येतेय हे पाहताच भावाच्या फितुरीचं दुःख गिळून ती पुन्हा उभी राहिली, विचारांची तलवार घेऊन रणांगणात आली अन बापाची ढाल झाली…ती आजही लढतेय, झुंजतेय, स्वाभिमानासाठी संघर्ष करतेय..! सांगा… काय चुकलं तीचं? असा भावनिक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

प्रशांत जगताप यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी अजित पवारांनी (Ajit Pawar) पक्षात पाडलेली फूट आणि त्यानंतरची स्थिती भावूक शब्दात मांडली आहे. (Supriya Sule)

जगताप यांनी या पोस्टला सांगा…काय चुकलं तीचं? असा मथळा दिला आहे. या पोस्टच्या माध्यमातून जगताप यांनी एकीकडे बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची बाजू मांडली आहे, तर दुसरीकडे अजित पवारांवर निशाणा साधला आहे. या पोस्टसोबत जगताप यांनी सुप्रिया सुळे, शरद पवारांचा एक फोटो शेअर केला आहे.

प्रशांत जगताप यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जवळपास ५० वर्षे भावाला आपुलकीनं राखी बांधली, भाऊबीजेला मायेने ओवाळलं. भावाकडून रक्षा करण्याचं वचन घेतलं अन त्या वचनावर भाबडेपणानं विश्वासही ठेवला.

पण.. एक दिवस कुटुंबावर शत्रुची सावली पडली.. भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला. शत्रूही असा कपटी अन अहंकारी… की ज्याला स्वतःला जिंकता आलं नाही तरी चालेल, पण केवळ आपल्या बापाला हरवायचंय.

भाऊ शत्रूला जाऊन मिळाला… पण का? तेच कळेना…काय हवं होतं या भावाला? काय द्यायचं बाकी होतं? जीवापाड प्रेम दिलं, माया दिली, सर्व चुकांवर पांघरून घातलं… काय द्यायचं बाकी होतं? बरं.. फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं? असा सवाल जगताप यांनी शेवटी केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election In Maharashtra | बारामती, रायगडसह 11 मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रक्रिया सुरू; 7 मे रोजी मतदान

Mundhwa Pune Crime | पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढले, लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार