Prashant Jagtap | शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात उभारलेल्या ऐतिहासिक लढ्याचा विजय – प्रशांत जगताप (VIDEO)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोदी सरकारने (Modi Government) लागू केलेल तीन कृषी कायदे (Agricultural laws) आज मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Pune NCP) वतीने पुणे शहर कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्रात सत्तेत असणाऱ्या क्रूर मोदी सरकारच्या विरोधात शेतकरी बांधवांनी उभारलेल्या ऐतिहासिक लढ्याचा विजय आज झाला असल्याचे प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले.

 

 

 

प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले की, कायदे तर रद्द झाले परंतु इतके दिवस शेतकऱ्यांचे हाल करून मोदी सरकारने (Modi government) काय मिळवलं हा प्रश्न कायम विचारला जाईल. आज कायदे मागे घेता येतील, परंतू या अन्यायाच्या विरोधात लढताना शहीद झालेल्या शेकडो शेतकरी बांधवांचे प्राण पुन्हा येतील का? एका हुकूमशहाच्या वेगवेगळ्या हट्टापायी आपण देशाचं किती नुकसान करत आहोत याचा गंभीरपणे विचार झाला पाहिजे.

 

यावेळी जय जवान जय किसान, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत सर्व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. याप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख (Pradip Deshmukh), बाळासाहेब बोडके (Balasaheb Bodke), निलेश निकम, मृणालिनी वाणी, शुभम माताले, महेश हांडे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title :- Prashant Jagtap | Victory in the historic struggle waged by the farmers against the Modi government – Prashant Jagtap

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा