प्रशांत जगताप यांची टीका ही राष्ट्रवादीचे अपयश झाकण्याचा प्रयत्न; चंद्रकांत पाटील यांच्या कोरोना काळातील सेवाकार्याची माहिती घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादीचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेली टीका ही स्वतः चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी आणि कोरोना काळातील राष्ट्रवादीचे अपयश झाकण्यासाठीची केविलवाणी धडपड आहे अशी टीका भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात दिसलेच नाहीत हे पुणेकरांनी बघितले आहे. किंबहुना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आवाहनानंतर पालकमंत्री महोदयांना जाग आली आणि त्यांनी पुण्यात बैठका घ्यायला सुरुवात केली. खरेतर महामारीच्या काळात सर्व जबाबदारी ही राज्य सरकारची व प्रशासनाची असते याचा बहुधा त्यांना विसर पडला त्यांना असावा.

कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कोरोना काळातील अफाट सेवा कार्य याचे मूल्यमापन घरात बसून केवळ टीका आणि प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणाऱ्यांना समजणें अवघडच. कर्वे संस्था अथवा एस एन डी टी कॉलेज येथे सुरु झालेल्या विलगीकरण केंद्रातील रुग्ण व सेवकांना चंद्रकांतदादांच्या वतीने शत प्लस सह आरोग्य सुरक्षा किट भेट देणे असो किंवा रुग्णांच्या मदतीसाठी धावून जाणे. कोथरूडचे आमदार म्हणून चंद्रकांत पाटील हे करत असलेले कार्य ह्याला प्रचंड असेच म्हणावे लागेल. एखाद्या लोकप्रतिनिधी ने स्वतःची टिमकी ना वाजवता एवढ्या मोठया प्रमाणावर सेवाकार्य करणे हे सतत राजकारण करणाऱ्यांना समजावून सांगणे अवघडच. तरी पण प्रशांतजी एकदा आपली टीम घेऊन या आणि एकदा चंद्रकांत पाटील यांचे सेवाकार्य स्वतःच्या डोळ्यांनी बघा / शक्य झाले तर त्यात सहभागी व्हा.

गत वर्षभरात असे एकही क्षेत्र नाही जेथे चंद्रकांत पाटील यांनी मदतकार्य केले नाही किंवा त्याकार्यामागची प्रेरणा ते ठरले नाहीत. सोसायट्यामध्ये सॅनिटायझशन असेल किंवा हँडसफ्री सॅनिटायझर स्टँड भेट देणे असेल, गरजूना ज्येष्ठ नागरिकांना घरपोच डबे पोहोचविण्याचा उपक्रम असेल किंवा मोफत Quarantine centre ची उभारणी असेल, अर्सेनिक अलबम चे मोफत वाटप असेल किंवा शिधा वाटप, चंद्रकांत पाटील यांनी कधीच हात आखडता घेतला नाही.पक्ष संघटनेला सोबत घेऊन, प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देऊन – आता दुसऱ्या लाटेत तर रक्तदान, प्लाझ्मा दान, रोज शेकडो नागरिकांना समुपदेशन व मोफत औषध पुरवठा, लसीकरण केंद्र व विलगीकरण केंद्राची उभारणी, क्रिकेटपटू हरभजनसिंग यांच्या सहकार्याने RTPCR व Antigen testing साठी ची मोबाईल व्हॅन पुणेकरांसाठी उपलब्ध करतानाच Oxygen व रेमडिसिवीर च्या सुरळीत पुरवठ्यासाठी प्रयत्न, परदेशातून Oxygen Concentrator व Ventilator मिळविण्यासाठी थेट पंतप्रधानांशी संपर्क साधून Import duty माफ करून घेत विशेष विमानाने हे साहित्य भारतात यावे यासाठीचे प्रयत्न आणि यासह चंद्रकांत पाटील यांनी आता Oxygen bed असलेले रुग्णालय उभारणीवर भर दिला आहे. संजीवनी रुग्णालयासह शहराच्या विविध भागात असे सर्व सुविधायुक्त रुग्णालयांची उभारणी करत असताना मनपा तील पदाधिकारी व नगरसेवकांना सूचना देऊन Oxygen Plant उभारण्यावर चंद्रकांत पाटील भर देत आहेतच. 10000 बाटल्या रक्तदान आणि किमान 2000 oxygen bed चे target ठेऊन काम करणारे चंद्रकांत पाटील यांनी शहरातील भाजपा टीम च्या माध्यमातून 6000 बाटल्या रक्तदानासह,200 जणांचे प्लाझ्मा दान, घडविले आहे, म्हणूनच ते केवळ कोथरूडकरांच्याच नव्हे तर पुणेकरांच्या पसंतीस उतरले आहेतच.आत्ता दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढलेला असताना रोज 1200 ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळ घरपोच जेवणाचा डबा देण्याचा उपक्रम असेल किंवा रोज 350 लहान मुलांना दूध व बिस्कीटचा पुरवठा सर्व कार्यात दादा अग्रेसर आहेत. राज्य सरकारच्या चुकांवर बोट दाखवत असताना दादांचे सेवाकार्य अव्यहातपणे सुरु आहे आणि म्हणूनच ते करत असलेली टीका प्रशांत जी आपण गांभीर्याने घ्यावी आणि दुसऱ्या लाटे पासून नागरिकांचा बचाव करतानाच तिसऱ्या लाटे साठी सज्ज होण्यासाठी पालकमंत्री अजित पवार व राज्य सरकारवर दबावगट म्हणून काम करतानाच चंद्रकांत पाटील यांचे सेवाकार्य आदर्श म्हणून घ्यावे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लहान मुलांना दूध बिस्किटे वाटण्याबरोबरच कोरोना च्या लढ्यात अगणित आणि अखंडित सेवाकार्याची न संपणारी मालिकाच चालवली आहे. प्रशांतजी जगताप यांनी किमान लहान मुलांना दूध बिस्किटे वाटप करून कोरोना च्या संकटकाळात काहीतरी योगदान द्यावे असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले आहे.