योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात पोस्ट टाकणाऱ्या ‘त्या’ पत्रकाराची सुटका करा : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटकेत असलेले पत्रकार प्रशांत कानोजिया यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल पोलिसांनी पत्रकार प्रशांत कनोजिया यांना शुक्रवारी (७ जून) रोजी अटक केली होती.

काय आहे प्रकरण –

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लग्नाचा प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगणाऱ्या महिलेचा व्हिडीओ कनोजिया यांनी ट्विटर व फेसबुकवर शेअर केला होता. त्याबद्दल कनोजिया यांच्याविरुद्ध हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि कनोजिया यांना अटक करण्यात आली. ही अटक बेकायदेशीर व घटनाविरोधी असल्याचा दावा करत कनोजिया यांच्या पत्नी जिगीशा अरोरा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती व तातडीने सुनावणीची मागणी केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय –

सर्वोच्च न्यायालयाने आज या प्रकरणी सुनावणी करताना त्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले. सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने अटक करणे चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. कनोजिया यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर जे वक्तव्य केले ते चुकीचे होते. मात्र, त्यासाठी त्यांना अटक करण्याची काय आवश्यकता होती असा सवाल न्यायलयाने केला आहे. कनोजिया यांच्या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही मात्र त्याबद्दल त्यांना अटक करण्याची आवश्यकता नव्हती असे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

सर्वोच्च न्यायलयाने कनोजिया यांच्या तात्काळ सुटकेचे आदेश दिले आहेत. मात्र, हा खटला सुरु राहणार असल्याचेही सांगितले आहे.

आरोग्य विषयक वृत्त –  

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा’

 

Loading...
You might also like