Prashant Kishor | ‘पुढील अनेक वर्षे देशात BJP चे वर्चस्व राहणार, मोदींच्या शक्तीचा राहुल गांधींना अंदाज नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Prashant Kishor | राजकीय रणनीतज्ञ म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी आज (गुरूवारी) एक मोठं विधान केलं आहे. यामुळे राजकीय वातावरणात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. भाजपा (BJP) येणाऱ्या अनेक दशकांमध्ये भारतीय राजकारणात एक प्रबल शक्ती म्हणून कायम राहणार आहे. त्यामुळे भाजपाविरोधात अनेक दशके लढावे लागेल. असं प्रशांत किशोर म्हणाले.

रणनीतीकार प्रशांत किशोर (Strategist Prashant Kishor) बोलताना म्हणाले की, याबाबतीत राहुल गांधींची (Rahul Gandhi) एक अडचण आहे. कदाचित काही काळातच जनता नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) सत्तेतून हटवेल, असे त्यांना वाटते. मात्र असे होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींच्या शक्तीचा अंदाज घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना हरवण्यासाठी प्रतिकार करू शकणार नाही. बहुतांश लोक त्यांची ताकद समजून घेण्यासाठी वेळ देत नाही आहे. अशी कोणती बाब आहे जी त्यांना लोकप्रिय बनवत आहे, हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना रोखू शकणार नाहीत.

Earn Money | 1 लाख गुंतवून दरमहा करा 8 लाख रुपयांपर्यंत ‘कमाई’, जाणून घ्या काय आहे व्यवसाय आणि कशी करावी सुरूवात?

लोक मोदींना कंटाळले आहेत आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढतील,
या भ्रमात अजिबात राहू नका, कदाचित जनता मोदींना सत्तेच्या बाहेर काढतील.
पण भाजपा कुठेही जात नाही आहे.
त्यासाठी तुम्हाला अनेक दशकांपर्यंत लढावे लागेल.
तर, 40 वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे काँग्रेस (Congress) सत्तेचे केंद्र राहिली होती.
त्याचप्रमाणे भाजपा (BJP) हरो अथवा जिंको ती सत्तेच्या केंद्रामध्ये कायम राहील.
जेव्हा एखादा पक्ष तीस टक्के मते मिळवतो तेव्हा तो राजकारणाच्या केंद्रातून लवकर हटत नाही,
असं प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी म्हटले आहे.

पुढे प्रशांत किशोर (Strategist Prashant Kishor) म्हणाले की, तुम्ही कुठल्याही काँग्रेस नेत्याशी किंवा प्रादेशिक नेत्याशी जाऊन बोललात तर ते सांगणार की आता केवळ काही वेळेचीच बाब आहे.
लोक मोदींवर नाराज आहेत.
सत्ताविरोधी लाट येईल आणि जनता त्यांना सत्तेतून बाहेर काढेल, पण असे होणार नाही.
असं प्रशात किशोर म्हणाले.

हे देखील वाचा

Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घसरण तर चांदीमध्ये वाढ, जाणून घ्या आजचे भाव

Pune News | ‘सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ’ स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ! महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर – भाजप महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे प्रतिपादन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Prashant Kishor | bjp will remain dominant countrys politics many more years rahul gandhi has no idea modis power says Prashant Kishor PM Narendra Modi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update