रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी घेतली शिवसेना खासदारांची बैठक 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांच्या सोबत बैठक घेतली आहे. बैठक पार पडतातच खा. संजय राऊत यांनी माध्यमांना संबोधित करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुंबईमध्ये हि बैठक पार पडली असून शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीचे रणनीती आखण्याचे काम प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आले आहे. का असे विचारल्यास संजय राऊत यांनी या शक्यतेला फेटाळून लावले आहे.

भाजप आणि शिवसेनेत युती संदर्भात कोणत्याही बैठका झाल्या नाहीत. आमचे नेते उद्धव ठाकरे निवडणुकीच्या संदर्भात जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व शिवसैनिकांना मान्य असेल त्याच प्रमाणे शिवसेनेची रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे समर्थ आहेत. आम्हाला कोणत्या रणनीतीकाराची आवश्यकता नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.

मोठ्या भावाच्या संकेताने माध्यम प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले कि महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ असेल या मात्र काहीच शंका नाही. त्याच प्रमाणे जनतेच्या आशीर्वादाने आम्ही भविष्यात देशात हि शिवसेनेचा प्रभाव निर्माण करू या बद्दल हि संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला आहे. तसेच देशाचा आगामी पंतप्रधान आम्ही निश्चित करणार आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीला सेना भाजप युती होणार का या संदर्भात राजकीय वर्तुळात कमालीची उत्कटता दाटलेली असताना. प्रशांत किशोर हे भाजपा येतर एनडीएतील नेते शिष्ट म्हणून युतीची बोलणी करण्यास का पाठवण्यात आले असा सवाल हि सर्वत्र विचारला जातो आहे. प्रशांत किशोर यांनी शिवसेनेच्या मनात युतीसाठी कोणता राजकीय मनसुबा उतरवला हे तूर्तास सांगता येणे कठीण आहे.