प्रशांत किशोर पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्री ? फक्त 1 रुपये असणार पगार, जाणून घ्या काय मिळणार सुविधा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना येथे कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रशांत किशोर टोकन मनी म्हणून फक्त 1 रुपये पगार घेतील. दरम्यान, त्यांना बंगला, कार्यालय, टेलिफोनसह इतर सुविधा देण्यात येतील.

सीएमओने जारी केलेल्या सेवा अटींमध्ये असे म्हटले की , प्रशांत किशोर यांचा कार्यकाळ पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून अमरिंदरसिंग यांच्या कार्यकाळाच्या समान असेल. त्यांना एक खासगी सेक्रेटरी, एक वैयक्तिक सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक आणि दोन शिपाई देण्यात येतील. तसेच त्यांना कॅबिनेट मंत्र्यांना मिळणार बंगला देण्यात येणार आहे. कार्यालय आणि कॅम्प कार्यालयात / निवासस्थानी लँडलाईन फोन व्यतिरिक्त मोबाइल फोनचा खर्चही उचलला जाईल, ज्याची कोणतीही मर्यादा नसेल . राज्य परिवहन आयुक्तांकडून त्यांना वाहतूक पुरविली जाईल. ते कॅबिनेट मंत्र्यांना पुरविलेल्या प्रवासाच्या सुविधेचा लाभ घेण्यास सक्षम असतील. हॉस्पिटलच्या नावावर तुम्ही 5 हजार रुपयांपर्यंत खर्च करू शकता. कॅबिनेट मंत्री यांना मिळणार्‍या वैद्यकीय सुविधाही त्यांना उपलब्ध असतील.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सोमवारी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची आपले मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याविषयी माहिती दिली. अमरिंदर सिंग यांनी ट्विट केले की, हे सांगण्यात आनंद होत आहे कि, प्रशांत किशोर मुख्य सल्लागार म्हणून माझ्याशी जोडले गेले आहेत. मी पंजाबमधील लोकांच्या हितासाठी एकत्र काम करण्यास आशावादी आहे. ” किशोर यांनी 2017 मध्ये पंजाब विधानसभेच्या वेळी काँग्रेसच्या निवडणुक प्रचाराची कमान सांभाळली होती. सध्या किशोरची कंपनी, भारतीय राजकीय कृती समिती (आय-पीएसी) ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगाल निवडणुकीत मदत करीत आहे. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत किशोर यांनी नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या प्रचाराची कमान सांभाळली होती.