‘आम आदमी पार्टी’कडून ‘अबकी बार 67 पार’चा नारा, PK करणार दिल्लीत ‘प्रचार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकांसाठी आम आदमी पार्टी सक्रीय झाली आहे. पक्षाने निवडणूकीच्या प्रचारासाठी प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांना आपल्या सोबत जोडले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत यांची माहिती दिली.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केजरीवाल यांचे ट्विट रिट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की अबकी बार 67 पार. ही घोषणा भले ही भाजपच्या अबकी बार मोदी सरकार सारखी असेल परंतू प्रशांत किशोर यांच्या आम आदमी पार्टीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

केजरीवाल म्हणाले, ही माहिती देण्यास मला आनंद होत आहे की आय पॅक आपल्यासोबत आहे. तुमचे स्वागत आहे. आय पॅक म्हणजेच ‘इंडियन पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटी’ प्रशांत किशोर यांची संस्था आहे. जी निवडणूकीच्या कॅम्पेनचे काम करते. एक वेळ होती जेव्हा पीएम मोदींच्या बरोबरीने प्रशांत किशोर यांनी निवडणूकीसाठी कॅम्पेन केले होते. पंजाबमध्ये विधानसभा निवडणूकीत देखील प्रशांत किशोर यांनी काँग्रेससाठी काम केले होते.

केजरीवाल मजबूत प्लेअर –
आयपॅकने देखील आप साठी काम करणार असल्याची माहिती दिली. आय पॅकने ट्विट केले की पंजाबच्या निवडणूकीनंतर आम्हाला कळाले की आप सर्वात मजबूत विरोधी पक्ष आहे. तुमच्याबरोबर जोडल्याचा आनंद आहे.

जेडीयूशी बंडाच्या तयारीत प्रशांत किशोर –
प्रशांत किशोर यांनी आपशी निवडणूकीच्या कॅम्पेनमध्ये जोडण्याचा निर्णय घेतला आहे, सध्या जेडीयूबरोबर प्रशांत किशोर यांचा वाद सुरु आहे. मागील काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे पक्षाच्या विरोधात उतरले आहेत. जेडीयूचे महासचिव आरसीपी सिंह म्हणाले की, जर प्रशांत किशोर पक्ष सोडू इच्छित असतील तर ते त्यासाठी स्वतंत्र आहेत. सिंह यांनी टीका केली की त्यांना अनुकंपाच्या आधारे पक्षात सहभागी करुन घेण्यात आले आहे. या दरम्यान शनिवारी प्रशांत किशोर जेडीयू प्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/