Prashant Nakti | प्रसिद्ध संगीतकार ‘प्रशांत नाकती’ प्रियासोबत अडकला लग्न बंधनात, Social Media वर शेअर केले फोटो

पोलीसनामा ऑनलाइन – Prashant Nakti | मराठी संगीत विश्वात ‘मिलीनीयर’ म्हणून ओळख असणा-या संगीतकार ‘प्रशांत नाकती’ने दर्जेदार मराठी गाणी बनवत मराठी गाण्यांना भारतातच नव्हे तर परदेशात पोहोचवलं. त्यांची सर्वच गाणी प्रदर्शित होताच काही सेकंदात सोशल मीडियावर ट्रेंडींग होतात. नुकतंच ‘प्रशांत नाकती’ आणि ‘प्रिया गोसावी’ यांचा सुंदर विवाहसोहळा मराठमोळ्या पद्धतीत पनवेल येथे थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला जवळपास २०० हून अधिक कलाकारांनी हजेरी लावली होती. (Prashant Nakti)

या विवाहसोहळ्यासाठी विनायक माळी (Vinayak Mali), गायक हर्षवर्धन वावरे (Harshavardhan Wavare), गायक रवींद्र खोमणे (Ravindra Khomne), गायक केवल वाळंज (Keval Walanj), गायिका सोनाली सोनावणे (Sonali Sonawane), संगीतकार कुणाल करण (Composer Kunal Karan) , विशाल फाले (Vishal Phale), नीक शिंदे, रितेश कांबळे, विजय सोनावणे, गौरी पवार अश्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती‌. (Prashant Nakti)

विशेष म्हणजे प्रशांत नाकतीने लिहीलेली, गायलेली सर्व गाणी अवघ्या काही तासातच हीट होतात.
सोशल मिडीयावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्रशांतची ‘पोरी तुझ्या नादानं’,
‘माझी बायगो’, ‘लाजरान साजरा मुखडा’, ‘मी नादखुळा’, ‘आपली यारी’ अशी एकाहून एक भन्नाट गाणी तुफान
व्हायरल झाली. प्रेमकहाणी सोबत सामाजिक विषय देखील त्यांच्या गाण्यात दिसून येतात.
आता लग्नानंतर प्रशांतचं नवीन गाणं कोणतं असेल यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. तर दुसरीकडे प्रशांतच्या लग्नाचं एक सुंदर ओरिजनल गाणं देखिल लवकरचं प्रदर्शित होणार आहे. सध्या सोशल मीडियावर, या नव्या गाण्याची चर्चा होत आहे.

Web Title : Prashant Nakti | Famous Musician ‘Prashant Nakti’ got married with Priya, photos shared on Social Media

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pandharpur Ashadhi Wari 2023 | आषाढी वारीत ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करण्यास बंदी

Maharashtra Cabinet Expansion | शिवसेना वर्धापन दिनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार? भाजपच्या 6 व शिवसेनेच्या 4 जणांना स्थान मिळण्याची शक्यता

Corruption In Maharashtra Education Department | राज्यातील ‘त्या’ सर्व शिक्षक, शिक्षण अधिकार्‍यांच्या उघड चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे अ‍ॅन्टी करप्शनला पत्र, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ