प्रशांत रामदासांची वीर मराठा मावळा संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन- मराठा समाजाप्रति असणारी तळमळ आणि आत्तापर्यंत केलेले कार्य त्याचबरोबर जिल्ह्यातील मराठा समाजासाठी असणारे योगदान लक्षात घेता. वीर मराठा मावळा संघटना, महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी श्री. प्रशांत रामदास उर्फ (संजू बाबा) पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

मराठा बांधवांना न्याय मिळावा व त्यांची सर्व कामे मार्गी लागावीत यासाठी तानाजी पाटील यांच्या संकल्पनेतून वीर मराठा संघटनेची स्थापना करण्यात अली असून. महाराष्ट्रभर सर्वत्र संघटना बांधणीचे काम संघटनेमार्फत सुरु आहे. यादरम्यान जळगाव जिल्ह्यात मराठा समाजाला चांगले नेतृत्व मिळावे जेणेकरून संघटनेच्या माध्यमातून सर्व समाजबांधवांची कामे मार्गी लागतील. यासाठी प्रशांत रामदास यांची निवड करण्यात आली. त्यांची समाजाप्रती असणारी तळमळ आणि वडिलांचे समाजासाठी असणारे योगदान लक्षात घेऊन संघटनेच्या वतीने त्यांच्यावर हि जबाबदारी टाकण्यात अली असल्याचे सांगितले जाते. या प्रसंगी, वीर मराठा मावळा संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री.तानाजी शामराव पाटील (नागरे), प्रदेश अध्यक्ष श्री.शेखर विनायकराव पाटील. पुणे जिल्हा प्रमुख प्रशांत भोसले आणि महिला जिल्हा प्रमुख छाया ताई भगत आदींची उपस्थिती होती…

पोलीसनामा ऑनलाईनशी बोलतांना प्रशांत रामदास म्हणाले की, मराठा समाजासाठी माझे वडिल म्हणजेच श्री.रामदास उर्फ (संजूबाबा) पाटील. यांचे पाचोरा तालुक्यासाठी मोठे योगदान होते. समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा मला त्यांच्याकडूनच मिळाली असून. संघटनेने दिलेल्या जबाबदारीला आणि माझ्या पदाला योग्य तो न्याय देण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेल मराठा समाजबांधवांच्या तसेच समाजातील तरुणांच्या प्रश्नांसाठी मी खंबीरपणे त्यांच्या मागे उभा राहील. असे मत त्यांनी व्यक्त केले.