राजकारणात भांडणाऱ्या भावांची कहाणी संजय दत्‍तचा ‘प्रस्थानम’ ! पहा ट्रेलर (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संजय दत्त, अली फजल आणि मनीषा कोयराला असलेली फिल्म ‘प्रस्थानम’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टने गुरुवारी दिल्ली येथे ट्रेलर रिलीज केला. अलीकडेच या चित्रपटाच्या कलाकारांची झलक दाखवणारे लूक पोस्टर्स प्रसिद्ध झाले होते, त्यानंतर या चित्रपटाविषयीची धाकधूक वाढत गेली. हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे.

ट्रेलरमध्ये संजय दत्त एक राजकारणी भूमिकेत आहे ज्याला दोन मुले आहेत. त्याला अली फजलला आपल्या राजकीय वारशाचा वारसदार बनवायचे आहे, तर त्याचा दुसरा मुलगा देखील हेच करू इच्छित आहे. अशा परिस्थितीत घराघरातच राजकारणाची लढाई सुरू होते. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर पहा.

20 सप्टेंबर 2019 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ‘प्रस्थानम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन देव कट्टा यांनी केले असून संजय दत्त यांच्यासह मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अली फजल, अमायरा दस्तूर हे मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या वर्षी हा चित्रपट बजेट अभावी रखडला होता मात्र आता संजय दत्त ने स्वतः निर्मात्याची जबाबदारी या चित्रपटात स्वीकारली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –