तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रताप कुंभारकर

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) – पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची नुकतीच निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी प्रताप कैलास कुंभारकर यांची तर उपाध्यक्ष पदी अमोल सीताराम कुंभारकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सरपंच नामदेव गंगाराम कुंभारकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये हि निवड करण्यात आली आहे. यावेळी उपसरपंच सुनील कुंभारकर, माजी सरपंच रामदास कुंभारकर, नाथाबापू कुंभारकर, आड. संजय कुंभारकर, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी कुंभारकर, भिमाजी कुंभारकर, सामाजिक कार्यकर्ते मारुती कुंभारकर, उद्योगपती शिवराम कुंभारकर, प्राथमिक शिक्षक भानुदास कुंभारकर, शरद कुंभारकर, ग्रामसेविका शीतल आटोळे, कर्मचारी रुपाली कुंभारकर, दत्तात्रय कुंभारकर त्याच प्रमाणे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.