शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ED नं घेतलं ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सकाळी ९. ३० वाजता च्या सुमारास अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक दाखल झालं. त्यानंतर छापेमारी सुरू केली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातील एकूण दहा ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांमध्ये सकाळीच पथक दाखल झालं होतं. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांच्या घरी देखील ईडीचा पथक दाखल झालं होतं. ईडीने विहंग सरनाईक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ताब्यात घेतलं आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची जवळ सर्च ऑपरेशन सुरू आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. तसेच काही राजकारण्यांना कारण यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आणि अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोसावी आणि कंगना राणावत प्रकरणी प्रताप सरनाईक यांनी आरोप-प्रत्यारोप केले होते. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे. दरम्यान, विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीच पथक निघून गेलं आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबईला घेऊन येण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

प्रताप सरनाईक यावेळी म्हणाले, की मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती तरीही छापा टाकण्यात आला आहे. ही कारवाई केवळ राजकीय सूडापोटी करण्यात आली आहे.

You might also like