भाजपा नेत्याचा अश्लील डान्स व्हायरल, निवडणूकीपुर्वीच राजकारण तापलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये 90 स्थानिक संस्थांमध्ये गुरुवारी मतदान होणार आहे आणि त्यापूर्वी प्रतापगड जिल्ह्यातील एका भाजपा नेत्याचे अश्लील डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका पाठोपाठ एक असे अर्धा डझन व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कॉंग्रेस नेत्यांच्या वक्तव्यामुळे छोटी साद्री क्षेत्रातील भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. येथे शनिवारी, जेथे एका भाजपा नेत्याविरूद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, आता छोटी साद्री ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष कैलाश गुर्जर यांचा बार गर्ल्ससोबत अश्लील डान्स व्हायरल झाला आहे.

या व्हायरल व्हिडिओंमुळे कॉंग्रेस आज होणाऱ्या मतदानामध्ये भाजपाला घेराव घालण्यात व्यस्त आहे. दुसरीकडे, या प्रकरणांसंदर्भात भाजपा नेत्यांचे बालिश स्पष्टीकरणे समोर येत आहेत. वास्तविक, प्रतापगड नगरपरिषद आणि जिल्ह्यातील छोटी साद्री नगरपालिकेत 28 जानेवारी रोजी होणाऱ्या नागरी निवडणुकांसाठी जोरदार राजकारण सुरू आहे. शनिवारी प्रतापगडमधील भाजपाच्या प्रभाग 7 मधील उमेदवार प्रल्हाद गुर्जर यांच्यावर एका महिलेने फसवणूक आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

यानंतर महिलेसोबत गुर्जरचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यामुळे भाजपाची चांगलीच बदनामी झाली. या विषयावर उलटे भाजपानेच कॉंग्रेसचे आमदार रामलाल मीणा यांच्यावर कठोर राजकारण केल्याचा ठपका लगावला. पण आता छोटी साद्री ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष कैलाश गुर्जरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते एका सोहळ्यादरम्यान बार डान्सर्ससोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहेत.

कॉंग्रेसचे छोटी साद्रीचे उपप्रमुख विक्रम आंजना यांनी हल्ला चढवताना भाजपा नेत्यांचे कृत्य, चारित्र्य आणि चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आंजना यांनी म्हटले की, ‘आजकाल भारतीय जनता पक्षाचे नेते जे आदर्शांबद्दल बोलतात त्यांच्यावर वासना व अश्लिलतेचे भूत स्वार आहे. याचे एक उदाहरण 23 जानेवारी 2021 रोजी बालिका दिनाच्या पूर्वसंध्येला निंबाहेरा येथील गाव मंगरोल मध्ये आयोजित एका कार्यक्रमात पाहायला मिळाले, जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या छोटी साद्रीचे ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष कैलास गुर्जरने एका समारोहादरम्यान कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आलेल्या एका महिलेसोबत सर्वांसमोर अश्लील कृत्ये केली आणि आपल्या अश्लीलतेचे उघडपणे सादरीकरण केले.’

या प्रकरणात मंडळाचे अध्यक्ष कैलास गुर्जर यांचे विधानही समोर आले आहे. त्यांचे म्हणणे आहे की हा त्यांचा कौटुंबिक कार्यक्रम होता आणि त्यास चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे.