महिला कॉन्स्टेबलच्या प्रेमात असणार्‍या तरूणाला जिवंत जाळलं, ग्रामस्थांनी केला पोलिसांवर हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यात सोमवारी काही उद्दामांनी एका व्यक्तीचे हातपाय बांधून त्याला जिवंत जाळले. तसेच ग्रामस्थांनी पोलिस अधिकाऱ्यांसमोर काही तासांपर्यंत उत्पात व जाळपोळ सुरूच ठेवला. तसेच गावकऱ्यांनी 2 पोलिस जीपसह तीन वाहनांना आग लावल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत 4 पोलिस जखमी झाले आहेत. हा संपूर्ण तांडव तब्बल 3 तास चालला. यावेळी पोलिस अधिकारी गावात जाऊ शकले नाहीत. नंतर आयजी आणि एडीजी घटनास्थळी प्रयागराज येथे पोहोचले. हे प्रकरण फतनपूरच्या भुजनी गावचे आहे, जेथे सोमवारी दुपारी घराबाहेर पडलेल्या अंबिका पटेल या तरुणाचा अर्धा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आंब्याच्या बागेत आढळला.

यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी डायल 112 ला कळविले. सीओ घटनास्थळावर राणीगंजला पोहोचले. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवरच दगडफेक केली. यात अनेक पोलिस जखमी झाले व गाडी सोडून पळून गेले. पोलिसांच्या 2 जीपसह ग्रामस्थांनी तीन वाहनांना आग लावली. ग्रामस्थांनी पोलिसांना गावात येण्यापासून रोखले आणि संताप व्यक्त केला. गावात अशी चर्चा आहे की अंबिका पटेलचे शेजारच्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. परंतु काही दिवसांनंतर मुलगी यूपी पोलिसात हवालदार पदावर भरती झाली होती आणि तिची पोस्टिंग दुसर्‍या शहरात झाली. या दरम्यान ते दोन्ही एकमेकांपासून दूर झाले. दोघांनाही लग्न करायचं होतं. परंतु ही गोष्ट घरातील सदस्यांना मान्य नव्हती. त्यानंतर अंबिकाने काही दिवसांपूर्वी मुलीसह त्याचा फोटो फेसबुकवर व्हायरल केला. यानंतर मुलीच्या वडिलांनी फतनपूर कोतवालीमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. हे प्रकरण पोलिस खात्याशी संबंधित असल्याने पोलिसांनी तातडीने अंबिका पटेलला अटक केली आणि तुरुंगात पाठविले. पण कोरोना साथीमुळे 1 मे रोजी तो पॅरोलवर सुटला आणि घरी परतला. त्यानंतर सोमवारी ही घटना घडली.

बदमाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले
सध्या पोलिसांनी दोन्ही बाजूच्या बदमाशांना ताब्यात घेतले आहे. प्रयागराज झोनचे आयजी आणि एडीजीही घटनास्थळी पोहोचले आणि तेथील चौकशी केली. हत्येनंतर गावात तणाव आहे हे लक्षात घेता पीएससीच्या 2 कंपन्या तेथे तैनात करण्यात आल्या आहेत. एसपी अभिषेक सिंह म्हणतात की, अंबिका या तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आले आहे. हत्येनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या तीन वाहनांना आग लावली आणि पोलिसांवर दगडफेक केली. अंबिकाने सोशल मीडियावर मुलीचा फोटो व्हायरल केला होता. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी या तरूणावर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल केला होता. दरम्यान मुलीच्या कुटूंबावर खुनाचा आरोप असून या सर्वांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे.