Prateik Babbar | एका मुलाखतीत प्रतीक बब्बरने त्याच्या भूतकाळातील अनेक गोष्टींचा केला धक्कादायक खुलासा; म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटांमुळे अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Babbar) हा चर्चेत आहे. सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रतीक विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवत आहे. तर एका कार्यक्रमात त्यानं मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला. जे ऐकून प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे. यावेळी प्रतीक नशेच्या आहारी जाऊन त्याने त्याच्या आयुष्याची वाट लावली होती आणि या परिस्थितीला त्यानं त्याची आई दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांना जबाबदार धरले होते. (Prateik Babbar)

 

मुलाखतीमध्ये प्रतीक ने या चित्रपटामागील त्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रतीक म्हणाला, ‘इंडिया लॉकडाऊन’ हा चित्रपट मी केवळ माझ्या आईसाठी स्वीकारला आहे. कारण हा चित्रपट मातीतला चित्रपट आहे. आपल्या लोकांशी जोडलेला आहे. माझ्या आईचे देखील अनेक चित्रपट हे मातीशी जोडलेले होते आणि मला एक वेगळ्या पद्धतीने तिला श्रद्धांजली वाहायची होती. यासाठी मी हा चित्रपट स्वीकारला. अनेक वेळा माझी तुलना माझ्या आईशी केली जाते. अशा गोष्टीचं माझ्यावर दडपण येत पण उत्साह ही मिळतो आणि आत्मविश्वास ही वाढतो. मला नेहमी एका प्रतिभावंत अभिनेत्रीचा मुलगा म्हणून ओळखले जाते. याचा मला सार्थ अभिमान आहे.

 

माझ्यासाठी तिच्या अभिनयाच्या जवळपास जाणंही खूप मोठी गोष्ट आहे. मला खूप राग येतो माझ्या रागामुळेच मी माझे करिअर संपवले आहे. एवढेच नाही तर या रागामुळेच माझ्या आयुष्याची देखील मी वाट लावून ठेवली होती. पण आता माझा थोडासा राग कमी झाला आहे. माझे आजी आजोबा मला सोडून गेल्यापासून मी आपल्या मातीत आपल्या लोकांशी हळूहळू जोडलं गेलो”. (Prateik Babbar)

प्रतीक पुढे म्हणाला, “माझ्या रागामुळे मी खूप काही सहन केले आहे.
मला जास्त राग तेव्हा यायचा जेव्हा मला मार्गदर्शन करण्यासाठी कोणीच नसायचं मी कुठे चुकतो हे सांगायला माझी आई नाहीये.
मी काय करतोय याविषयी कोण बोलणार यावेळी मी आकाशाकडे एकटक बघत बसायचो आणि या सगळ्यासाठी जबाबदार तूच आहेस कारण तू माझ्यासोबत नव्हतीस असे मी आईला दोष द्यायचो.
माझं बालपण इतर मुलांप्रमाणे नव्हतं”. असेही प्रतीक ने सांगितले.
‘इंडिया लॉकडाऊन’ हा चित्रपट 2 डिसेंबर रोजी ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केले. या चित्रपटात प्रतीक बब्बरबरोबर सई ताम्हणकर,
श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी या कलाकारांनी देखील काम केले आहे.

 

Web Title :- Prateik Babbar | prateik babbar opens up about his past and uased to blame his mother for that

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune City Street Vendors Committee Election | पुण्यातील नगर पथविक्रेता समिती निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत जाहीर

Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government | शिंदे सरकारला लवकर घालवले नाही तर महाराष्ट्राचे 5 तुकडे पडतील

T20 World Cup 2024 | ICC कडून टी-20 विश्वचषक 2024 च्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल; जाणून घ्या