#Video : प्रतीक बब्बरने अर्ध्या रात्री पत्नीला दिले ‘असे’ सरप्राईज, व्हॅलेंटाईनला न्यूड फोटोमुळे झाले होते ट्रोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याने काही महिन्यांपूर्वीच सान्या सागरसोबत लग्न केलं आहे. बुधवारी प्रतीकने सान्याचा वाढदिवस साजरा केला. प्रतीकने अर्ध्या रात्री जाऊन सान्याला सरप्राईज दिलं. प्रतीक फूल, गिफ्ट आणि केक घेऊन घरी आला होता. या क्षणांचे काही फोटो प्रतीकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/Bw61k7fnJgL/

या फोटोंमध्ये प्रतीक सान्याला किस करताना दिसत आहे. यासोबतच त्याने एक मेसेजही लिहिला आहे. प्रतीकने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “शुटींगच्या मध्ये डिनर ब्रेक होता. तेव्हाच मी 12 वाजता सान्यासाठी गिफ्ट, फूल आणि केक घेऊन घरी आलो. आम्ही अवघ्या 5 मिनिटात केक कापला आणि हॅप्पी बर्थडे झाला. त्यानंतर मी कामावर परत गेलो.”

https://www.instagram.com/p/Bw6o2NXHlJI/

सान्यानेही आपल्या नवीन आयफोन आणि बुकेचा फोटो शेअर केला आहे. याला खास कॅप्शनही दिले आहे. सान्या लिहिते की, “तू खूपच क्युट आहेस. तो पूर्ण रात्र शुटींगमध्ये बिजी होता. परंतु 12 वाजता मला सरप्राईज देण्यासाठी घरी आला. माझ्या बेबी केक मी तुझ्यावर खूप प्रेम करते.”

तुम्हाला सांगू इच्छितो की, सान्या आणि प्रतीक यांनी 23 जानेवारी रोजी लखनऊमध्ये लग्न केलं होतं. यानंतर व्हॅलेंटाईन डेला दोघांनीह आपला न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर दोघांनाही खूप ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच प्रतीकने हे फोटो डिलीट केले होते.

काही युजर्सने म्हटले होते की, हे कपल पब्लिसिटीसाठी अशा प्रकारचे फोटो शेअर करत आहे. प्रतीक शेवटचा अ‍ॅमेझॉन प्राईमच्या Four more shots please या वेब सिरीजमध्ये दिसला होता. यात त्याने बारटेंडरचा रोल केला होता. यानंतर तो आता नितेश तिवारी यांच्या छिछोरे या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सुशांतसिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत आहेत.

https://www.instagram.com/p/BtRCYT-ny8g/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BtQ-QVCH3L6/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BtSsy3UnitE/?utm_source=ig_embed