ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्‍का ; वसंतदादा पाटील यांचे नातू आणि माजी मंत्री प्रतिक पाटील यांचा काँग्रेसला रामराम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापले असतानाच काँग्रेसचे माजी मंत्री आणि वसंतदादा पाटील यांचे नातु प्रतिक पाटील यांनी काँग्रसेला अखेर रामराम केला आहे. वसंतदादा गटाच्या मेळाव्यात पाटील यांनी ही घोषणा केली. गेल्या चार दिवसांपुर्वी प्रतिक पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यावेळी त्यांच्या निकटवर्तींनी वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. गेल्या काही दिवसांपासून प्रतिक पाटील हे पक्ष श्रेष्ठींवर नाराज होते असे सांगण्यात येत आहे.

प्रतिक पाटील हे १५ व्या लोकसभेचे सभासद होते. ते काँग्रेसकडून सांगली येथुन निवडुन आले होते. सध्या राज्यातील अनेक राजकीय पक्षातील मोठया नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर माजी मंत्री आणि वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतिक पाटील यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. मात्र, अद्यापही प्रतिक पाटील हे कोणत्या पक्षाच्या वाटेवर आहेत हे स्पष्ट झालेले नाही. ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत हे अद्यापही स्पष्ट नाही.

प्रतिक पाटील यांनी काँग्रेसला रामराम केल्याने काँग्रेसला मोठा धक्‍का बसला आहे. औरंगाबाद येथील अब्दुल सत्‍तार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झालेले आहे. आता माजी मंत्री प्रतिक पाटील यांनी काँग्रेसला रामराम केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.