Pravah Phulala Sugandha | ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरच्या ‘त्या’ पोस्टची चर्चा; “मी तुला कधीच…”

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pravah Phulala Sugandha | छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका नेहमीच चर्चेत असते. या मालिकेतील किर्ती आणि शुभमच्या हटके लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. या मालिकेतील सर्वच पात्र घराघरात पोहोचली आहेत. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग काही दिवसांपूर्वीच शूट करण्यात आला. त्यानंतर या मालिकेतील अनेक कलाकार या मालिकेला निरोप देताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. (Pravah Phulala Sugandha)

 

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील किर्ती हे पात्र समृद्धी केळकरने साकारले आहे. तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेमुळे समृद्धीला एक वेगळीच ओळख मिळाली होती. नुकतंच समृद्धीने या मालिकेतील किर्ती या पात्रासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टबरोबर तिने मालिकेतील काही फोटो शेअर केले आहेत. (Pravah Phulala Sugandha)

 

काय लिहिले आहे पोस्टमध्ये?
“किर्ती…
कला , अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक मुलीचा ड्रीम रोल असावा असं हे विविधरंगी पात्र…
विविधरंगी याचसाठी म्हटलं कारण या पात्राला अनेक छटा पैलू आहेत, होते.
सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणारी, समंजस, घरातल्यांना आणि बाहेरच्यांनाही समजून सांभाळून घेणारी, नाती जपणारी, स्वप्नपूर्तीचा ध्यास असणारी… मात्र कोणताही अन्याय सहन न करणारी… स्वतःचं स्पष्ट मत वेळोवेळी मांडणारी, स्वतःवर पूर्ण विश्वास असणारी अशी ही किर्ती साकारताना नकळत खऱ्या आयुष्यात पण खूप काही शिकायला मिळालं.
romantic sequence तर मालिकांमधे करायला मिळतातच, पण किर्ती IPS officer असल्यामुळे मालिकेतल्या एका टिपिकल सुनेचं काम करता करता फायटिंग सिक्वेन्स, वेगवेगळ्या physical activities, military training, अगदी बंदूक चालवायला शिकेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी शिकायला, करायला मिळाल्या.

व्यावसायिक आयुष्यात तर मला किर्तीने खूपच दिलं आहे. पण वैयक्तिक आयुष्यात पण मला तिनं अजाणतेपणी बरंच शिकवलं आहे. किर्तीचं आत्मविश्वासाने मुद्दे मांडणं, वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या स्वभावाप्रमाणे सांभाळून घेणं आणि अवघड असूनदेखील वेळ आली, की संयमानं वागणं हे मी समृद्धी म्हणून माझ्या वैयक्तिक आयुष्यातदेखील आत्मसात करण्याचा, तसं वागण्याचा प्रयत्न करत आहेच.

 

किर्ती मी तुला कधीच नाही विसरू शकणार. तू माझ्या हृदयाच्या खूप जवळ होतीस, आहेस आणि कायम राहशील.
थँक्यू यू किर्ती, खूप प्रेम”, असे समृद्धी केळकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

‘फुलाला सुगंध मातीचा’ हि स्टार प्रवाहावरील सर्वात जुनी मालिका होती.
फार कमी वेळात हि मालिका लोकांपर्यंत पोहोचली.
हि मालिका कंटाळवाणी होत चालल्याने या मालिकेला लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली.
यानंतर या मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घ्यायचे ठरवले आहे.

 

Web Title :- Pravah Phulala Sugandha | star pravah phulala sugandha maticha serial samruddhi kelkar aka kirti share emotional post

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dhondi Champya Trailer | भरत जाधव-वैभव मांगलेची तुफान कॉमेडी असलेला ‘धोंडी चंप्या; एक प्रेम कथा’चा ट्रेलर प्रदर्शित

Nana Patekar | ‘हे फक्त नितीन गडकरीच करू शकतात’ – नाना पाटेकर

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आता थेट संवाद साधा