Praveen Darekar | ‘राष्ट्रवादीने ‘ते’ पाऊल उचललं तर… ‘; प्रवीण दरेकरांचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Praveen Darekar | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ED ने चौकशीसाठी बोलावलं. त्या दिवशी त्यांची जवळपास 8 तास चौकशी झाली आणि त्यांना ईडीने ताब्यात घेतलं. कोर्टात 9 दिवसांची ईडी कोठडी न्यायालयाने दिली. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाने (NCP) आक्रमक भूमिका घेत भाजपवर जोरदार टीका आणि आंदोलने केली. केंद्रीय यंत्रणा भाजपच्या (BJP) सांगण्यानुसार काम करत असल्याची टीका राष्ट्रवादीने केली. नवाब मलिकांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. मात्र राष्ट्रवादीने मलिकांचा राजीनामा (Resigned) घेणार नसल्याचं सांगितलं. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

 

नैतिकतेच्या मुद्द्यावर राज्यात अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. आता कुठे गेला ठाकरी बाणा त्यांना पटत असेल मात्र ते बोलणार कसे?, कारण राष्ट्रवादीने (NCP) पाठींबा काढला तर सत्तेचं काय होणार, यामुळे मुख्यमंत्री (CM) हतबल झाले असल्याचं म्हणत प्रवीण दरेकरांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. पुण्यामध्ये (Pune) ते बोलत होते.

 

ठाकरे सरकारमधील (Thackeray Government) मंत्र्यांनी मंत्रालयातील महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं होतं. त्यावरूनही प्रवीण दरेकर यांनी टीका केली. महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करायला नवाब मलिक (Nawab Malik) हे साधू संत किंवा अहिंसेचे पुजारी नव्हते. मलिक हे देशभक्त असल्यासारखा आव आणला जात असल्याचंही दरेकर म्हणाले.

दरम्यान, भाजपवर कायम आरोप केला जातो की भाजप यंत्रणांचा गैरवापर करते.
मात्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यांच्यावरील कारवाईची मागणी भाजपने केली नसल्याचं दरेकरांनी सांगितलं.

 

 

Web Title :- Praveen Darekar | pravin darekar on ncp nawab malik in pune today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ramdas Athawale In Pune | महापालिका निवडणुकीत ‘रिपाइं’ला 25 जागा हव्यात; रामदास आठवले म्हणाले – ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वयंभू राजे’

 

Pune Cyber Crime | क्रिप्टो करन्सी गुंतवणुक योजनेत अनेक पुणेकरांची फसवणूक; सायबर पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून केली अटक

 

Indian Student Killed In Russia-Ukraine war | धक्कादायक ! रशिया आणि युक्रेनमधील युद्धात भारताचा पहिला बळी, ‘या’ राज्यातील विद्यार्थ्यांचा मृत्यु !