प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्‍तपदी नियुक्‍ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सन 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळील अधिकारी म्हणुन ओळखले जाते. मुंबई महापालिकेचे आयुक्‍त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्‍ती करण्यात आल्यानंतर रिक्‍त झालेल्या जागेवर परदेशी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

राज्याचे मावळते मुख्य सचिव यूपीएस मदान यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सल्‍लागार म्हणुन नियुक्‍ती करण्यात आली आहे. मदान यांची देखील आजच नियुक्‍ती करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी हे सध्या मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्‍त मुख्य सचिव म्हणुन कार्यरत होते. आता त्यांची नियुक्‍ती मुंबई महापालिकेच्या आयुक्‍तपदी करण्यात आली आहे. यापुर्वी प्रवीण परदेशी यांची पुणे महापालिकेचे आयुक्‍त म्हणुन काम पाहिले होते. परदेशी हे सन 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

You might also like