Pravin Darekar | भाजप नेते प्रवीण दरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pravin Darekar | मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात (Mumbai Bank Bogus Labor Case) काही दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) भाजपचे (BJP) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre – Arrest Bail Application) फेटाळला होता. त्यानंतर दरेकर यांनी मुंबई हाय कोर्टाचा (Mumbai High Court) दरवाजा ठोठावला. दरम्यान आता मुंबई हाय कोर्टाकडून दरेकरांना दिलासा मिळाला आहे. दरेकर यांना हाय कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

 

”प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीचा होता. तसेच या प्रकरणात चौकशीसाठी पोलीस कोठडीची कोणतीच गरज नव्हती. न्यायालयाने हीच गोष्ट लक्षात घेऊन आज दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. फक्त राजकीय हेतूने सरकारने प्रवीण दरेकर यांना तुरुंगात टाकण्यासाठी हा गुन्हा दाखल केला होता. परंतु, कोर्टाने या प्रकरणात कोठडीतील चौकशीची गरज नाही, असं स्पष्ट केलं. प्रवीण दरेकर यांना अटक करण्याची गरज नाही. त्यांना अटक झाली तरी त्यांना बाँडवर सोडण्यात येईल,” अशी माहिती दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे (Lawyer Akhilesh Choubey) यांनी दिली आहे.

 

दरम्यान, वकील अखिलेश चौबे यांनी मुंबै बँकेतील बोगस मजूर या उल्लेखावर देखील आक्षेप घेतला आहे.
त्यासाठी अखिलेश चौबे यांनी शासनाचा एक आदेश प्रसारमाध्यमांना दाखवला आहे. कोणत्याही मजूर संस्थेत मजूर नसलेल्या 2 व्यक्तींना सदस्यत्वाचे स्वातंत्र्य असते.
असं ते म्हणाले. तर ते संबंधित मजूर संस्थेचे कोणत्याही बँकेत प्रतिनिधित्व करू शकतात, असं देखील या आदेशामध्ये सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- Pravin Darekar | bjp leader pravin darekar granted anticipatory bail by bombay hc in mumbai district bank case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा