Pravin Darekar | ‘बँका तुम्ही लुटायच्या आणि गुन्हे आमच्यावर दाखल करायचे, जरंडेश्वर कारखान्याचे मारेकरी कोण हे सांगणार’ – प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pravin Darekar | भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर (Mumbai Bank) अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्याप्रकरणी आम आदमी पक्षाने आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरुन दरेकरांवर मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात (Mata Ramabai Ambedkar Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला गेला आहे. यानंतर प्रवीण दरेकर विधान परिषदेत सत्ताधारी पक्षावर चांगलेच आक्रमक झाले आहेत.

 

”भंडारा, राष्ट्रवादी काँग्रेस लेबर फेडरेशनचा अध्यक्ष त्याच्यावर कारवाई नाही, त्याच्यावर गुन्हा नाही. त्याला वेगळा कायदा. कैलास नगीने, भुसाळकर पुणे राष्ट्रवादी काँग्रेस, श्री भोयर गडचिरोली काँग्रेस, श्री साठे सांगली राष्ट्रवादी काँग्रेस, प्रमोद झांबरे सातारा राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण नरावणे, उस्मानाबाद काँग्रेस, मोरेश्वर वर्धा काँग्रेस, श्री तनवीर अमरावती काँग्रेस, श्री बंटी शिरसाट बीड राष्ट्रवादी काँग्रेस लेबर फेडरेशनचे अध्यक्ष, हे गरीब मजूर. माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला, कारवाई सुरू आहे. तर हे कोण आहेत या संदर्भात आपल्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर आणत आहे.” असं प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटलं आहे.

 

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, ”मला वाटतं सभापती या व्यतिरिक्त 130 आजी – माजी आमदारांची यादी आहे. या सर्वांची यादी मी वाचून दाखवत नाही पण संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे. प्रश्न माझ्या विरोधातील कारवाईचा नाहीये. प्रवीण दरेकर विरोधात कारवाई झाली, नाहीतर सांगून टाकू कारवाई फक्त दरेकरांच्या विरोधात होती.” (Pravin Darekar In Vidhan Parishad)

दरम्यान, त्यानंतर प्रवीण दरेकर म्हणाले, ”सहकार विभागाने, सीएमओनं अधिकाऱ्यांवर दबाव टाकून माझ्याविरोधात कारवाई केली जात आहे. विरोधी पक्षनेत्यांना चिरडून टाकण्याचे काम केले जातंय. यासंदर्भात मी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांकडे तक्रार देणार असल्याचंही ते म्हणाले. त्याचबरोबर साखर कारखानदारी या महाराष्ट्राचं वैभव आहे. हे कसं या पुढाऱ्यांनी वाटोळं केलं आहे. हे मुद्द्यासह मांडणार आहे. ती एक म्हण आहे ना की, राजाने बिडी प्यायली तर ती स्टाईल आणि गरिबाने प्यायली तर तो भिकारी अशा मनोवृत्तीत हे राज्य सरकार काम करत आहे.”

 

”महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा घोटाळा मी या ठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखित करतो.
आजपर्यंतचा देशातील सर्वात सुनियोजित घोटाळा कुठला असेल तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा आहे.
बरं हे कुणी केलं ? इथं करोडो रुपयांचे डल्ले मारले आहेत. अपुऱ्या तारण मूल्य असलेल्या संस्थांना कर्जपुरवठा केला.
सुरेश धस यांना तारण घेऊन कर्ज दिलं, नियमित कर्जफेड होत आहे.
पण सुरेश धस 3 नगरपरिषदेवर झेंडा फडकवतात आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो,” असं देखील दरेकर म्हणाले.

 

जरंडेश्वर कारखान्याचे खरे मारेकरी कोण हे मी सांगणार…

”आधी सहकारी बॅंकेकडून अव्वासव्वी कर्ज काढायचे आणि नंतर ते कारखाने लिलावात काढायचे.
मग कालांतराने कारखान्याची विक्री खाजगी संस्थेला करायचे.
यावर एखादा चित्रपट निघेल. जरंडेश्वरवर कितीचे कर्ज होते तर केवळ 19 कोटीचे.
इतकी मदत केली जावू शकले असते. पण तसे झाले नाही. निविदा काढली तेव्हा 12 जणांनी भाग घेतला.
त्यानंतर 2 – 3 वेळा निविदा काढली. आणि नंतर गुरू कमोडीटीला विकली गेली.
आता एफआयआरमध्ये 67 मोठ्या लोकांची नावे आहेत. पोलीस उपायुक्तांने या सर्वांना क्लीन चिट दिली.
पुणे जिल्हा बॅंकेने 10 वर्षात जरंडेश्वरला 700 कोटी रूपये कर्ज दिले.” असं दरेकर यांनी सांगितलं आहे.

 

Web Title :- Pravin Darekar | BJP leader pravin darekar said you robbed banks and charges files against up will expose killer of jarandeshwar sugar factory

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा