भाजपचा एकही आमदार एकनाथ खडसेंच्या संपर्कात् नाही

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन –   भाजपमधील एकही आमदार एकनाथ खडसेंच्या ( Eknath Khadse) संपर्कात नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) कसे काम करतात हे माहिती असताना इतर आमदार त्यांच्यासारखी राजकीय भवितव्याची आत्महत्या का करतील, असा सवाल भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar on Eknath Khadse quits bjp) यांनी केला आहे. खडसेंनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना भाजपमधील 10 ते 12 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. याबाबत प्रवीण दरेकरांनी विचारले असता त्यांनी खडसेंवर टीका केली.

खडसे हे कालपर्यंत भाजपात होते म्हणून आमदार त्यांच्या संपर्कात होते. पण आता एकही आमदार त्यांच्या संपर्कात नाही. भाजपाचे भविष्य सर्वांना माहित आहे. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस कसे काम करतात हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे इतर कोणताही आमदार खडसे यांच्यासोबत जाणार नाही, असे ते म्हणाले.

त्यांना आमच्या शुभेच्छा, नांदा सौख्य भरे

तसेच पहाटे शपथविधी घेणे ही नैतिकता आणि राष्ट्रवादीत गेले की अनैतिकता असे खडसे म्हणाले होते. आता ते त्याच राष्ट्रवादीत गेलेत, याबाबत फडणवीसांची बदनामी आम्ही भोगली आहे. शरद पवार खडसें यांच्यावर तोडपाणी करणारा नेता म्हणून आरोप करतच होते. त्यामुळे त्यांच्या पक्षात जाऊन त्यांनी नैतिकतेच्या गोष्टी करुन नयेत. त्यांना आमच्या शुभेच्छा, नांदा सौख्य भरे, असे शब्दात प्रविण दरेकरांनी खडसेंवर टीका केली.

You might also like