मग तुम्ही कशाला राज्य सरकार चालवता? उठसूठ केंद्राकडे बोट दाखवण बंद करा, दरेकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

पोलीसनामा ऑनलाईन : राज्य सरकारचा (State Government) एकही विषय, एकही दिवस, एकही सेकंद केंद्राशिवाय जात नाही. कुठलीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट दाखवयचे मग तुम्ही कशाला राज्य सरकार चालवता?. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणे आता बंंद करावे, अशा शब्दात विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar) यांनी महाविकासआघाडी सरकारवर (Mahavikasaghadi government) निशाणा साधला आहे.

 

 

 

 

दरेकर म्हणाले की, कुठल्याही शहराचे नामकरण करण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव, राज्य सरकारची मंजुरी आणि मग केंद्राची मान्यता अशी प्रक्रिया आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करायच असेल, तर महापालिका तुमची आहे तिथे ठराव करा, राज्याच्या कॅबिनेटला निर्णय द्या. असे देखील दरेकर यांनी म्हटले आहे. कुठलीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट दाखवयचे मग तुम्ही कशाला राज्य सरकार चालवता? महाकाली लेणी संदर्भात निर्णय घेताना तुम्ही केंद्राला विचारलं होतं का? आमच्या अस्मितेसंदर्भात कुठलाही विषय केंद्राकडे अडकणार नाही. आम्ही त्याच्या पाठीशी असू. परंतू, नाचता येईना अंगण वाकडं अशी त्यांची गत झालेली आहे.

 

 

 

 

 

आता आहे का हिंमत, सत्ता सोडण्याची
काँग्रेसने नामांतराच्या मुद्यावर घेतलेल्या भूमिकेबद्दल बोलताना दरेकर शिवसेनेला उद्देशून म्हणाले, बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर आता प्रतिक्रिया द्यावी. काही झालं तरी चालेल, प्रसंगी सत्ता सोडू पण संभाजीनगर नामकरकण करू असे म्हणत होते, आता आहे का हिंमत? आता त्यांना सत्ता जास्त महत्वाची आहे. त्यामुळे केंद्राकडे बोट दाखवून जनतेचं फार काळ लक्ष विचलीत करता येणार नाही.