Pravin Darekar | ‘थोबाड सगळ्यांना रंगवता येतं, प्रसिद्धीसाठी केलेल्या वक्तव्यांना मी महत्व देत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pravin Darekar | भाजप नेते (BJP) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन दरेकर यांनी पुण्यात शिरूर येथील क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त टिपण्णी केली होती. या विधानावरुन राष्ट्रवादी (NCP) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रत्युतर दिलं. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे. आता यावरुन प्रविण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला गरिबांकडे पाहाण्यासाठी वेळ नाही. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष’ आहे’. कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याची टीका प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली होती. यावरुन राष्ट्रवादीतून संताप व्यक्त होतो आहे. तसेच रुपाली चाकणकर यांनीही दरेकरांना प्रत्युत्तर देत थेट इशारा दिला आहे. यावरुन आता दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझं वक्तव्य महिलांचा अपमान करणारं नव्हतं, ‘माझे वक्तव्य नीट ऐकले तर त्याचा अर्थ कळेल पण हे दुसरं काही नाही तर वड्याचं तेल वांग्यावर काढायचा प्रकार आहे, कारण अशा वक्तव्यांमुळे त्यांना थोडीफार प्रसिध्दी मिळते, असं दरेकरांनी म्हटलं आहे.

पुढे दरेकर म्हणाले की, थोबाड सगळ्यांना रंगवता येतं, अशा प्रकारचं अतिरेकी भाषण करणं योग्य नाही. भाजप हा गरीब, श्रमिक, उपेक्षित आणि समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करतो. तर, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धनदांडग्यांसाठी, प्रस्थापितांसाठी, मोठ्यांसाठी काम करतो. याप्रकारे रंगलेल्या गालाचा मुका घेण्याचा प्रयत्न करतो, असे मी म्हटलं होतं. त्यामध्ये, कुठेही महिलेचा संबंध नाही, असं ते म्हणाले.

 

काय म्हणाल्या होत्या रुपाली चाकणकर?

प्रविण दरेकर ज्या प्रकराचे आपण वक्तव्य केलंय त्याबद्दल आपण महिलांची माफी मागा अन्यथा राष्ट्रवादी महिला आघाडी,
महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवू शकतो याची जाणीव आपण ठेवावी,
असा थेट इशाराच रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिला आहे.
प्रविण दरेकरजी, आपण विरोधी पक्षनेते आहात, विधानसभेच्या वरच्या सभागृहाचे नेते आहात,
अभ्यासू आणि वैचारिकता असलेलं हे सभागृह आहे.
मात्र, आपल्या वक्तव्यामुळे अभ्यासाचा आणि वैचारिकतेचा आपल्याशी दूर दूरपर्यंत संबंध नसल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे.

Web Titel :- Pravin Darekar | face can paint everyone i dont care about publicity statements pravin darekar on rupali chakankar statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amravati News | अमरावतीमध्ये मोठी दुर्घटना ! होडी उलटल्याने एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले; तिघांचे मृतदेह बाहेर काढले, मदतकार्य युध्दपातळीवर सुरू

Gold Price Update | लागोपाठ चौथ्या दिवशी स्वस्त झाले सोने, आता 27532 रुपयात मिळतेय 10 ग्रॅम; जाणून घ्या नवीन दर 

Pune Crime | शिवसेनेच्या नगरसेवकाकडं मागितली तब्बल 15 लाखाची खंडणी ! माजी उपसरपंच, पत्रकार व 4 महिला कार्यकर्त्यासह 9 जणांवर FIR, ‘रिपोर्टर’सह दोघांना अटक