Pravin Darekar In Pune |’महागाई, बेरोजगारी वाढली ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, परंतू भारतीय जनता PM नरेंद्र मोदी यांच्यावर खूश’ – प्रविण दरेकर

'8 वर्षात माझ्याही व्यवसायाची प्रगती झाली आहे' - प्रविण दरेकर (विरोधी पक्षनेता, विधान परिषद)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pravin Darekar In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारच्या आठ वर्षांच्या सत्ताकाळात गरिबांची संख्या २१ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. कोरोना आणि रशिया व युक्रेन दरम्यानच्या युद्धामुळे (Russia Ukraine War) अलिकडे महागाई वाढली (Inflation Hike) आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परंतू यातूनही जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने (Modi Government) पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर भारतीय जनता (Indian People) खूश आहे. या कालावधीत माझाही व्यवसाय व आर्थिक स्तर वाढला आहे, मी देखिल खूश आहे असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar In Pune) यांनी पत्रकार परिषदेत केले.

 

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा नुकतेच आठ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. या कालावधीत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी शहर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रविण दरेकर यांनी माहीती दिली. याप्रसंगी भाजपचे शहरअध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), भाजपचे संघटन समन्वयक राजेश पांडे (Rajesh Pandey), शहर सरचिटणीस राजेश येनपुरे (Rajesh Yenpure) आदी यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आठ वर्षाच्या कालावधीत शेतकरी, उद्योग, सुरक्षा, सर्वसामान्य जनतेबद्दल घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी दरेकर यांनी दिली. दरेकर म्हणाले, २०१४ मध्ये असलेला गरिबीचा २१ टक्के दर होता. तो १० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. कोरोना काळात गरिब कल्याण योजनेअंतर्गत ८० कोटी जनतेला अन्नधान्य पुरविण्यात आले. या आठ वर्षांच्या काळात देशाचे सकल उत्पन्न तसेच नागरिकांचे दरडोई उत्पन्न दुपटीने वाढले आहे. भ्रष्टाचाराविरोधात कडक कारवाई सुरू करण्यात आली असून प्रामाणिक कर दात्यांची संख्या दुपटीहून अधिक झाली आहे. मोदी यांच्या कारभारावर जनता खूश असून यामुळेच त्यांना भक्कम पाठींब्याने पंतप्रधानपदी संधी दिली आहे. (Pravin Darekar In Pune)

 

वाढती महागाई व बेरोजगारीमुळे सध्या देशातील जनता खूश आहे ? असे विचारले असता दरेकर म्हणाले,
मागील दोन वर्षात कोरोना आणि रशिया व युक्रेन दरम्यानच्या युद्धामुळे महागाई वाढली आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
परंतू केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करून जनतेला दिलासा दिला आहे.
महागाईचा दर कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
या आठ वर्षाच्या कालावधीबाबत एक नागरिक म्हणून आपण खूश आहात का ? असे विचारले असता दरेकर म्हणाले, मी खूश आहे.
मागील आठ वर्षात मी जॅकेट, टोपी घालू लागलो. माझ्या व्यवसायाची प्रगती झाली. माझी आर्थिक प्रगती झाली.

 

 

Web Title :- Pravin Darekar In Pune | Inflation Unemployment Rise Can Not Be Denied But Indian People Are Happy With PM Narendra Modi Government BJP Leader Pravin Darekar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा