Pravin Darekar | ‘त्या’ वक्तव्यावरुन प्रविण दरेकर यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pravin Darekar | भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. नुकतंच प्रविण दरेकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टिकेचे झोड उठवली होती. त्यावेळी दरेकर यांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशावर महिलांविषयी अपमानास्पद विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीने (NCP) हा गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सिंहगड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रविण दरेकर यांच्याविरुद्ध कलम 509 खाली सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तर, प्रविण दरेकर (Pravin Darekar) तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी, कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने याबाबत मी पुण्यात एफआयआर दाखल केले आहे. अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

प्रवीण दरेकर यांनी शिरुर येथे 13 सप्टेंबर रोजी आदयक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या 230 व्या जयंती निमित्त जाहीर कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. दरेकर यांच्या विधानावरुन राष्ट्रवादीने त्यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

13 सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात आयोजित कार्यक्रमात दरेकर बोलत होते.
लवकरच शिरुरमधील लावणी कलाकार सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावर भाष्य करताना दरेकरांनी टीका केली होती.
या प्रवेशावर नाव न घेता, ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे’ अशी टिपण्णी दरेकरांनी केली होती.
या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे, असल्याचा गंभीर आरोपही दरेकरांनी केला होता.

हे देखील वाचा

Saibaba Sansthan Shirdi | शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक

Gold Price Today | खुशखबर ! 10,000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pravin Darekar | ncp leader rupali chakankar files fir against pravin darekar in pune over his controversial statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update