अशोक चव्हाणांचं ‘ते’ वक्तव्य ठरवून, समस्यांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा डाव : प्रवीण दरेकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण (Ashok Shankarrao Chavan) यांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये किती आलबेल आहे हे दिसतंय असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी लगावला आहे. सगळ्या प्रश्नांचं अपयश झाकण्यासाठी 8-10 दिवसातून असं वक्तव्य नियोजनबद्ध करत आहेत असा आरोप देखील दरेकर यांनी केला आहे.

अशोक चव्हाण यांनी असं वक्तव्य केलं होतं की, काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री (Chief Minister) निधी देत नाहीत. यावरूनच आता प्रवणी दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, “बदल्या, विकासकमांच्या निधीवरून यांच्यात वाद होताना दिसत आहेत. आपल्याकडे फायदा व्हावा अशा पक्षीय चढाओढीत महाराष्ट्राची जनता आणि विकासकामांकडे दुर्लक्ष होत आहे.” अशी टीकाही त्यांनी केली आहे.

इतकंच नाही तर मुख्यमंत्री न्याय देत नाहीत म्हणून लोक राज्यपालांकडे (Governor) जात आहेत. तिकडे का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करावं असा टोलाही त्यांनी लगावला आहे.