Pravin Darekar on Raj Thackeray | ‘…म्हणून राज ठाकरेंनी एक पाऊल मागे घेतलं’ – प्रविण दरेकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pravin Darekar on Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केलेल्या घोषणांप्रमाणे रमजान ईददिवशी (Ramadan Eid 2022) मनसेकडून राज्यभर महाआरत्या (Mahaarati) करणार येणार होत्या. मात्र औरंगाबादच्या (Aurangabad) सभेनंतर त्यांनी महाआरत्या रद्द करण्यात आल्याचं सांगितलं होतं. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं भाजपकडून स्वागत करण्यात आलं आहे. अशातच यावर भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar on Raj Thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

राज ठाकरे हे सर्व गोष्टी शांततेत करत आहेत. त्यांनी आज एक पाऊल मागे घेतलं म्हणजे माघार घेतली असं होत नाही. चार पाऊलं पुढे टाकण्यासाठी एक पाऊल मागे घेतलं असल्याचं प्रवीण दरेकर (Pravin Darekar on Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी ईदच्या दिवशी आरत्या रद्द करण्याच्या निर्णयाबाबत पोस्ट करत माहिती दिली होती.

रमजान ईद आहे, संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा.
आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया (Akshaya Tritiya) या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या (MNS Mahaarati) करू नका.
आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही.
भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे, असं राज ठाकरे (Raj Thackeray on Mahaarati) यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.

 

दरम्यान, औरंगाबादच्या सभेदिवशी मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सभा चालू होती.
मात्र फडणवीसांची सभा संपताच राज ठाकरे व्यासपीठावर गेल्याने या टायमिंगबाबत जोरदार चर्चा होत्या.
आता दरेकर यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे.

 

Web Title :- Pravin Darekar on Raj Thackeray | mns chief raj thackeray took 1 step back to go 4 steps forward said that bjp leader praveen darekar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा