Praveen Darekar | ‘पवार-मोदी भेटीत नुसती हवा-पाण्याची चर्चा होणार नाही, राजकीय चर्चा तर होणारच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) सकाळीच दिल्लीत भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावरून सर्वत्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘येत्या सोमवारपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होतंय. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली असावी, असं सांगतानाच पवार मोदींना भेटायला गेले म्हणजे नुसत्या हवापाण्याच्या गोष्टी करणार नाहीत. राजकीय चर्चा तर होणारच, असं सूचक वक्तव्य प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केलं आहे.

COVID 19 मधून बरे झाल्यानंतर तुमची मुले ‘या’ आजारांची शिकार तर होत नाही ना? जाणून घ्या लक्षणे

pravin darekar reaction on sharad pawar and pm narendra modi meeting in delhi

काय म्हणाले दरेकर?

प्रवीण दरेकर बोलताना म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली की नाही मला माहीत नाही. कल्पना नाही. त्यामुळे माहीत नसलेल्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य होणार नाही. शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे ते पंतप्रधान मोदींना भेटणं स्वाभाविक आहे, असं दरेकर म्हणाले. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील 3 पक्षाचं तीन दिशेला तोंड आहे. म्हणून पवार व्यथितही असतील. महाराष्ट्राचा विकास पुढे जात नाही या कल्पनेमुळे ते व्यथित असतील. अशावेळी मोदींसोबत चर्चा करावी असं त्यांना वाटलं असेल. राजकीय पक्ष कोणताही असला तरी आपल्या राज्याचा विकास करणं हाच प्रत्येक पक्षाचा अंतिम ध्यास असतो. पण पवार मोदींना भेटायला गेले म्हणजे ते नुसत्या हवापाण्याच्या गोष्टी करणार नाहीत. राजकीय चर्चा तर होणारच, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

पुढे दरेकर म्हणाले, ‘शरद पवारांचं (Sharad Pawar) व्यक्तिमत्व वादातीत असू शकतं. पण त्यांचं
राजकारण विकासाभोवती फिरतंय हे विरोधक असलो तरी आम्ही मान्य करतो. पवार मोठे नेते आहेत.
महाराष्ट्रातील विकासाचे प्रश्न, राजकीय अस्थिरता, गुंतागुंतीचे विषय आणि अडचणीचे विषय आहेत त्यावर
चर्चा करण्यासाठी ते गेले असतील. एखाद्या विषयावर अंतिम उपाय हा मोदींकडेच मिळू शकतो, असं पवारांना
वाटलं असेल. शिवाय या भेटीला अधिवेशनाची पार्श्वभूमीही आहे, असे ते म्हणाले.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  pravin darekar reaction on sharad pawar and pm narendra modi meeting in delhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update