Pravin Tarde | प्रवीण तरडे यांना ’कलाजीवन गौरव’ पुरस्कार

पुणे : Pravin Tarde | महाराष्ट्राचे साहित्यप्रेमी, पहिले मुख्यमंत्री व लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या रविवार दि. 12 मार्च या जयंतीदिनी ‘स्व.यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार वितरण’ व कवी संमेलन यांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दि .12 मार्च रोजी. रात्री ९.00 वाजता, टिळक स्मारक मंदिर ,पुणे येथे संपन्न होत आहे. यामध्ये प्रख्यात दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांना कै. प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ ‘कला जीवन गौरव पुरस्कार’, रोख रक्कम २५,००० रु. व मानचिन्ह देऊन गौरविले जाईल. माईर्स एम. आय.टी.चे संस्थापक व महासंचालक डॉ .विश्वनाथ कराड यांच्या शुभहस्ते व नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रख्यात कवींचे कवी संमेलन व अन्य पुरस्कार वितरण देखील या कार्यक्रमात आयोजिले आहे.

स्व.प्रकाश ढेरे चॅरीटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे यंदाचे ३५ वे वर्ष आहे. अशी माहिती, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आणि स्व .प्रकाश ढेरे चॅरीटेबल ट्रस्टचे विश्वस्त विजय ढेरे , संजय ढेरे व सचिन जाधव यांनी दिली. (Pravin Tarde)

यावेळी संपन्न होणाऱ्या कवी संमेलनात वर्जेश सोलंकी (वसई),आबा पाटील (जत), नितीन देशमुख(चांदूरबाजार-अमरावती), हर्षदा सुंठणकर (बेळगाव), किरण येले(मुंबई), प्रभाकर साळेगावकर(माजलगाव), अबीद शेख(पुसद), गजानन मते(परतवाडा), मगोपाळ मापारी(बुलढाणा) यांचा समावेश असून जेष्ठ कवी रामदास फुटाणे व अशोक नायगावकर याचे सूत्रसंचालन करतील.

याच कार्यक्रमात ४ नामवंत कवींचा प्रत्येकी ११,००१ /- व स्मृतीचीन्ह असा साहित्य पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.
’वेरवीखेर या काव्यसंग्रहाचे कवी वर्जेश सोलंकी (वसई) यांना कै.शिवाजीराव ढेरे स्मृती पुरस्कार,
‘घामाची ओल धरून’ या काव्यसंग्रहाचे कवी आबा पाटील (OV) यांना कै.बाबासाहेब जाधव स्मृती पुरस्कार .
‘प्रश्न टांगले आभाळाला’ या काव्यसंग्रहाचे कवी नितीन देशमुख(चांदूरबाजार-अमरावती) यांना
कै.धनाजी जाधव स्मृती पुरस्कार, आणि ‘कपडे वाळत घालणारी बाई’ या काव्यसंग्रहाच्या
कवयित्री हर्षदा सुंठणकर(बेळगाव) यांना कै.सुगंधाताई ढेरे स्मृती पुरस्कार, देऊन गौरविले जाईल.

या कवी संमेलन व पुरस्कार वितरण समारंभास रसिकांनी आवर्जुन यावे असे आवाहन कवी रामदास फुटाणे यांनी केले आहे .

Web Title : Pravin Tarde | ‘Kalajeevan Gaurav’ award to Praveen Tarde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime News | इमारतीच्या छतावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या; मुंबईमधील घटना

Pune Crime News | दारु पित बसले असल्याचे म्हटल्याने दारुची बाटली फोडली तरुणाच्या डोक्यात; कोंढव्यातील पुण्यधाम आश्रमजवळील मैदानातील घटना

Solapur Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या