Pravin Togadia | ‘भविष्यात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात’, प्रविण तोगडियांचे वक्तव्य

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान (BJP Jan Ashirwad Yatra) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली होती. राणे यांच्या वक्तव्यामुळे महराष्ट्रातील शिवसैनिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करुन राणे यांचा निषेध केला होता. या प्रकरणामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादावर विश्व हिंदू परीषदेचे (vishva hindu parishad) अध्यक्ष प्रविण तोगडीया (Pravin Togadia) यांनी भाष्य केले आहे. प्रविण तोगडिया (Pravin Togadia) हे नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

प्रविण तोगडिया म्हणाले, उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद भविष्यात मिटेल
आणि हे दोघेही एका ताटात जेवतील. हे राजकारण आहे. यात सर्व चलाते.
आज भाजप-शिवसेना (Shivsena) जरी विरोधात असली तरी ते उद्या एका ताटात जेवतील,
त्यांचं हे सुरूच राहील.
हे कधी भांडतील आणि कधी एकमेकांच्या गळ्यात पडतील हे सांगता येत नाही.

देशाच्या हितात जे काम करतील त्यांच्या बाजूने आम्ही राहू.
भाजपने देशाच्या हितात काम केले तर आम्ही भाजप जिंदाबाद म्हणू, शिवसेनेने केले तर
शिवसेना जिंदाबाद म्हणू तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress)
यांचा देखील जयजय कार करु.
आम्ही आता कोणत्या दलाचे गुलाम नाही आहोत.
जे देश हिताचे काम करतील त्यांच्या बाजूने आम्ही असणार असल्याचे प्रवीण तोगडिया यांनी सांगितले.

 

सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताला तालिबानकडून (Taliban) धोका असल्याचे मत
तोगडिया यांनी व्यक्त केले आहे.
भारतात तालिबानी विचारधारेचे केंद्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच जे शरणार्थी भारत अफगाणिस्थान (Afghanistan) मधून आणत आहेत त्यांचीच पिढी
भविष्यात आपल्या पोलिसांना मारतील याचे उदाहरण फ्रान्स (France) मध्ये बघायला
मिळाले असल्याचे तोगडिया यांनी सांगितले.

Web Title : pravin togadia on uddhav thackeray and narayan rane maharashtra shivsena bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti Corruption Trap | लसीकरणासाठी 400 रुपयाची लाच घेणारा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

New Royal Enfield | प्रतीक्षा संपली, या दिवशी लाँच होईल Royal Enfield Classic 350 नेक्स्ट जनरेशन, जाणून घ्या काय असू शकतात फीचर्स आणि किंमत

Pune Crime | गारवा बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार करुन फरार झालेले आरोपी गजाआड