दिल्लीतील प्रदूषणावर भाजपा मंत्र्यानं सुचवला ‘अजब’ उपाय, जाणून तुम्ही ‘विचार’ देखील करू शकत नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये प्रदूषणाने धुमाकूळ घातला असून दिल्लीतील एनसीआर भागामध्ये कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक बांधकामास मनाई केली आहे. मोठ्या प्रमाणात आरोग्य धोक्यात असून यामुळे दोन दिवस नोएडातील शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रदूषणाने कमालीची पातळी देखील ओलांडली असून नागरिकांच्या जीवाला यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र यावर भाजपच्या एका मंत्र्याने अजब विधान केले असून यावरून आता वाद निर्माण होऊ शकतो.

उत्तरप्रदेशचे राज्यमंत्री सुनील भराला यांनी प्रदूषणावर अजब उपाय सुचवला असून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी इंद्रदेवाला खूश करा आणि यज्ञ करा असे म्हटले आहे. त्याचबरोबर यासाठी शेतकऱ्यांना जबाबदार ठरवणे देखील चूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उसाचा आणि डाळींचा पाला पेटवल्याने प्रदूषण होते हे म्हणणे चुकीचे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जबाबदार ठरवण्याऐवजी इंद्रदेवाला खुश करण्यासाठी यज्ञ करण्याचा उपाय त्यांनी सुचवला आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असून काही ठिकाणी शाळा बंद ठेवण्याचे आदेश देखील सरकारने दिले आहेत. नागरिकांना मास्क घालूनच घराबाहेर पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Visit : Policenama.com