प्रयागराजमध्ये गंगा-युमनाचा ‘हाहाकार’ ! शेकडो घरे पाण्याखाली (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संगम नगरी प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुनेच्या आलेल्या महापुरामुळे तीरावरील परिसर पाण्यात बुडून गेला आहे. गंगा नदीने पाण्याची जास्तीची पातळी ओलांडली आहे. तर यमुना नदीच्या सुद्धा पाण्याची पातळी वाढली आहे. पुराचे पाणी हजारो लोकांच्या घरात घुसले आहे त्यामुळे अनेकांना आपले घरदार सोडून स्थलांतर करावे लागले आहे. गंगा आणि यमुना नदीच्या सोबतच्या नद्या सुद्धा पावसात असल्यामुळे पाण्याची पातळी सतत वाढत आहे.

महापुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने बचाव कार्य सुरु केले आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. एनडीआरएफच्या अनेक टीमने हजारो लोकांना मोटारबोटच्या माध्यमातून वाचवले आहे. अनेक लोकांनी मदत केंद्रामध्ये आश्रय घेतलेला आहे. पाण्याखाली बुडालेली अनेक घरे पाहूनच लक्षात येते की पुराची क्षमता किती मोठी आहे. महापुरामुळे १२ वी पर्यंतच्या शाळा तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.

राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेशामध्ये या वेळी जोरदार पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  गंगा नदीच्या तीरावरील लोकांना मदत करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

अनेक घरे पाण्याखाली बुडालेली आहेत. महापुराची संकटामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झालेले आहे. आपत्तीजन्य भागाची अधिकाऱ्यांकडून सतत पाहणी केली जात आहे.

visit : Policenama.com