क्लास संपल्यानंतर थांबवत होता महाविद्यालयीन विद्यार्थीनींना, शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार

उत्तरप्रदेश : वृत्तसंस्था – आज सगळीकडे खाजगी शिकवणीला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्व पालकवर्ग आपल्या मुलांना खाजगी शिकवणीला पाठवण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. मात्र उत्तरप्रदेशमधील प्रयागराज जिल्ह्यात घडलेली संतापजनक घटना ऐकून आपण डांग व्हाल.

आनंद शुक्ला नाव असलेल्या एका खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने ‘एक्सट्रा क्लास’ च्या नावाखाली एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. क्लास संपल्यानंतर आरोपी शिक्षक हायस्कूलला असलेल्या विद्यार्थिनीला आणखी काही वेळ थांबवून घेऊन तिचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर येत आहे.

पोलिसांनी लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली आरोपी शिक्षकाला अटक केले आहे. प्रयागराज मधील नैनी भागात आरोपी शिक्षक मागच्या १ वर्षांपासून विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करत होता. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार पीडित मुलगी १५ वर्षाची असून ती मागच्या १ वर्षांपासून खाजगी क्लास ला जात होती. काही दिवसापासून तिचे मानसिक स्वास्थ्य बरोबर नसल्यामुळे घरच्यांनी तिला डॉक्टर कडे दाखवले असता तिचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले.

खूप प्रयत्नानंतर शनिवारी मुलीने आपल्या आई वडिलांना सांगितले कि एक्सट्रा क्लास च्या नावाखाली खाजगी शिकवणी चालक गैरकृत्य करत होता. मुलीने सांगितले की, तिने जेव्हा या गोष्टीचा विरोध केला तेव्हा आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळेच मुलगी मागच्या अनेक दिवसापासून परेशान असायची. पीडित मुलीच्या घरच्यांनी प्रयागराजमधील नैनी कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी च्या विरोधात पॉक्सो ऍक्ट अंतर्गत खटला दाखल केला असून आरोपीला अटक केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like