चीनने ‘कोरोना’वरील संशोधन चोरले, अमेरिकेचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे जगभरातील देश लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असून मृतांचाही आकडा मोठा आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनवर मोठा आरोप केला आहे. कोरोना व्हायरसवरील संशोधनातील बौद्धीक संपदा आणि संशोधनातील डेटा चोरत असल्याचा आरोप त्यांनी चीनवर केला.

कोरोनाशी निगडीत ज्या संस्था संशोधन करत आहेत आहेत त्यांना चीनमधील सरकारशी निगडीत कंम्प्युटर हॅकर्सद्वारे लक्ष्य केले जाऊ शकते असा दावा एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी विभागाद्वारे करण्यात आला होता. त्यांच्या या दाव्यानंतर लगेचच पॉम्पिओ यांनी चीनवर कोविड 19 च्या संशोधनाचा डेटा चोरत असल्याचा आरोप केला आहे. चीनशी संबंधित असलेल्या सायबर हॅकर्सने केलेल्या प्रयत्नांचा अमेरिका निषेध करते आणि अशा कारवाया थांबवल्या पाहिजेत असे आम्ही आवाहन करतो.

चीन असा देश आहे ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली आहे. त्यांच्यामुळेच जगभरात हा व्हायरस पसरला. चीनने कोरोना व्हायरसशी निगडीत माहिती जगाला देण्यास मनाई केली. त्यामुळेच आज मोठी समस्या निर्माण झाली आहे, असेही पॉम्पिओ म्हणाले. दरम्यान, अमेरिकेत आतापर्यंत 14 लाखांच्या जवळपास लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर गेल्या 24 तासात 1 हजार 754 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील मृतांची संख्या 85 हजार 813 वर पोहोचली आहे. अमेरिकेत आतापर्यंत एक कोटी पेक्षा अधिक लोकांची चाचणी करण्यात आली आहे.