वाघोली संघ ठरला PRD चषकाचा मानकरी

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन (धर्मा मैड) – शिरूर येथील माजी रविंद्र ढोबळे यांच्या वतीने आयोजित नगराध्यक्ष प्रकाशशेठ रसिकलाल धारीवाल चषक (पी आर डी) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कार्यसम्राट अशोक पवार वॉरियर्स वाघोली संघाने प्रथम क्रमांक मिळवून पी आर डी चषकाचा मानकरी ठरला. तर द्वितीय क्रमांक चा मानकरी रविकांत वरपे व शरद पवार फायटर शिरूर संघ ठरला तर संपूर्ण सामन्याचा मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी राहुल सातव वाघोलीतो हिरो होंडा मोटर सायकल चा मानकरी ठरला आहे.

शिरूर येथे माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे यांच्या वतीने उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल व शिवसेवाा सचिव स्वर्गीय केशरसिंग खुशाल सिंग परदेशी या दोन मित्रांच्या स्मरणार्थ नगराध्यक्ष सभागृहनेते प्रकाशशेठ रसिकलाल धारिवाल चषक (पी आर डी) क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ आमदार अशोक पवार व उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, माजी आमदार पोपटराव गावडे हस्ते झाला.

यावेळी आमदार अशोक पवार, सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल, माजी आमदार पोपटराव गावडे उद्योगपती आदित्य शेठ धारिवाल, शिव सेवा मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास परदेशी, बाजार समितीचे संचालक राजेंद्र गावडे, मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे स्पर्धेचे, हभप किरण महाराज भागवत, आयोजक रविंद्र ढोबळे, स्पर्धेचे संयोजक प्रशांत शिंदे, नगरसेवक जाकीर ख़ान पठाण, नगरसेवक विजय दुगड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र काळे, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, शहर युवक अध्यक्ष रंजन झांबरे प्राध्यापक दादासाहेब गवारी, प्रविण दसगुडे, दादाभाऊ वाखारे, आबिद शेख, अशोक पवार, बांधकाम व्यवसायिक सुभाष गांधी, तुकाराम खोले, आंबेगाव विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत पाचंगे, जयवंत साळूके, जयसिंग धोत्रे, तिरंगा बिर्याणीचे फिरोज शेख, संजय चव्हाण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बाराहाते, निलेश कोळपकर, सागर नरवडे, संतोष शिंतोळे, समालोचक फिरोज भाई बागवान, दत्ता पवार, गुलाम पठाण, रविंद्र जाधव, सागर ढवळे, राहुल पवार सनी दळवी राजेंद्र ढोबळे विजय ढोबळे, अजय ढोबळे, तुषार माने, ऋतिक ढोबळे, तेजस माने, रवींद्र गुळादे, राजेंद्र माने यांसह स्पर्धेसाठी पुण्यातील नामांकित पंच व मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

या स्पर्धेचा अंतिम सामना कार्यसम्राट आमदार अशोक पवार वाढदिवस वाघोली व रविकांत वरपे व शरद पवार फायटर्स शिरूर यांच्यात रंगला. हा सामना पहाण्यास शिरूर शहर व तालुक्यांतून दहा हजार प्रेक्षक उपस्थित होते तर या या सामन्याची सुरुवात नाणेफेक उद्योगपती आदित्य धारिवाल यांच्याहस्ते करून सामन्यात सुरुवात केली होती. यावेळी प्रजासत्ताक दिन असल्याने राष्ट्रगीत झाले व सर्वांना उद्योगपती आदित्य धारिवाल यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रथम क्रमांक कार्यसम्राट आमदार अशोक पवार वारियर्स वाघोली 71 हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांक रविकांत वरपे व शरद पवार फायटर्स शिरूर हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांक मोहन राखपसरे फायटर्स शांतीनगर, 51 हजार व चषक, चतुर्थ क्रमांक खंडू शेंडगे फायटर्स दौंड 41000 व चषक, शिस्तबद्द संघ आर के फायटर्स शिरूर, मॅन ऑफ द सिरीज राहुल सातव वाघोली हिरो होंडा बाईक चा मानकरी ठरला.

बेस्ट बॉलर – सुदाम खोडदे (पोलीस) शिरूर, बेस्ट बॅट्समन – राहुल सातव (वाघोली), बेस्ट विकेट किपर – रजनीकांत पडवळ (कुंजीरवाडी), बेस्ट कॅच – नवनाथ सोनटक्के, 3 षटकार बाळा शिंदे (शिरूर).

शिरूर-हवेली तालुक्यातून भारतीय संघ, रणजी संघ व आयपीएल सारख्या सामन्यात मजल मारण्यासाठी खेळाडूंनी प्रयत्न करावे यासाठी सर्व मदत करणार असल्याचे आमदार आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

शिरूर सारख्या शहरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिशय सुंदर उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारीवाल चषक क्रिकेट स्पर्धा भरवून शिरूर शहराचा नावलौकिक संपूर्ण राज्यात पोहोचवण्याचे काम माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे यांनी केले आहे.

शिरूर शहरांमध्ये आयपीएल सारख्या क्रिकेट स्पर्धेचे हे आयोजन असून अतिशय सुंदर गॅलरी आणि आणि देखणे स्टेडियम उभारले आहे या स्पर्धा चां जिल्हा व राज्यात नावलौकिक आहे. असे प्रकाश भाऊ धारीवाल (उद्योगपती, सभागृहनेते शिरूर) यांनी सांगितले.

शिरूर येथे भरवलेल्या पीआरडी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये या क्रिकेट स्पर्धेत ऑनलाईन युट्युब वर प्रक्षेपण ठेवण्यात आले होते. तर रयत शिक्षण संस्था शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सुंदर प्रकारच्या गॅलरीज सुंदर प्रकारचे स्टेडियम सजवण्यात आली होती. यामुळे या स्टेडियम आयपीएल सारखा भास जाणवत होता. या स्पर्धा पाहण्यासाठी शिरूर, श्रीगोंदा, पारनेर, हवेली या तालुक्यातून हजारो नागरिक उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like