GST काऊंसिल बैठक : अर्थमंत्री निर्मला सितारामनांनी दिले ‘TAX’ मध्ये बदलाचे संकेत, जाणून घ्या

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या पहिल्याच GST परिषदेच्या बैठकीत मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की GST परिषदेने देशाच्या स्वातंत्र्यानंतर जबरदस्त काम केले आहे. काउन्सिलला आता GST चे नियम आणि कररचनेच्या सुधारणेवर काम करावे लागेल. याशिवाय GST च्या नियंत्रणाखाली अधिक वस्तू आणण्यासाठी देखील काम केले पाहिजे.

अरुण जेटली यांनीही दिले होते संकेत
GST स्लॅबमध्ये बदल करण्याचे संकेत अरुण जेटली अर्थमंत्री असतानादेखील मिळाले होते. अरुण जेटली यांनी त्यावेळेस त्याच्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, भविष्यातील मार्ग निश्चित कारण्यासाठी १२ % आणि १८ % दोन स्टॅंडर्ड रेटच्या जागी एक सिंगल स्टॅंडर्ड रेट लागू करण्यासाठी काम केले जाईल. नवीन रेट १२ आणि १८ टक्यांच्या दरम्यानचा असेल.

राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत बैठक
या आधी निर्मला सीतारामन यांनी राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत बैठक घेतली. अर्थसंकल्पा आधी घेतलेल्या बैठकीत त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार आर्थिक वृद्धीची दिशा निश्चित करते. परंतु जमिनीवर केंद्राच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे हे राज्याचे काम आहे. सीतारामन म्हणाल्या की, जोपर्यंत राज्य आणि केंद्र सरकार मिळून काम करणार नाहीत तोपर्यंत आर्थिक लक्ष्याला गाठण्यात यश मिळू शकत नाही.

आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची