Pre-Diabetes Diet | डायबिटीजचा धोका वाटतोय का? बचावासाठी खायला सुरूवात करा ‘या’ गोष्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pre-Diabetes Diet | टाईप 2 मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्याला प्री-डायबेटिस म्हणतात. मधुमेहाची समस्या मुळापासून नाहीशी करता येत नाही, त्यावर नियंत्रण ठेवू शकता. परंतु प्री-डायबिटीजची समस्या मुळापासून दूर करून मधुमेहाच्या धोक्यापासून मुक्ती मिळू शकते. यासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्हीही प्री-डायबेटिस असाल तर काही गोष्टींचा आहारात समावेश करून तुम्ही टाइप 2 मधुमेहापासून कायमची सुटका मिळवू शकता. त्या खास गोष्टींबद्दल जाणून घेवूयात (Pre-Diabetes Diet) –

 

1. भेंडी (Okra) –
भेंडी हा अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिसेकेराईड्सचा एक उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे ब्लड शुगर कमी होते. ब्लड शुगर कमी (Blood Sugar Low) करण्याच्या क्षमतेमुळे, भेंडीच्या बियांचा वापर मधुमेहावरील नैसर्गिक उपचार म्हणून बराच काळापासून केला जात आहे.

 

2. पालेभाज्या (Vegetable) –
प्री-डायबिटीज रुग्णांसाठी पालेभाज्या खूप फायदेशीर ठरतात. पालेभाज्यांमध्ये सल्फोराफेन मुबलक प्रमाणात आढळते. सल्फोराफेन हा आयसोथियोसायनेटचा एक प्रकार आहे जो ब्लड शुगर कमी करतो. (Pre-Diabetes Diet)

 

3. सुकामेवा (Dried Fruit) –
एका संशोधनानुसार सुकामेवा आणि ब्लड शुगर लेव्हलमध्ये एक संबंध आहे. सुकामेवा खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल कमी होऊ शकते. बाकीच्या तुलनेत, टाईप 2 मधुमेह संशोधनातून असे दिसून आले आहे की दररोज 50 ग्रॅम नट्स खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल कमी होऊ शकते.

4. डाळी (Pulses) –
प्रोटीन, फायबर आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे, जी बीन्स आणि डाळींमध्ये आढळतात, ती ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करू शकतात. यामध्ये हाय लेव्हल रेसिस्टन्स स्टार्च आणि विद्रव्य फायबरचा समावेश आहे. जे खूप हळू पचतात आणि शरीरातील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवतात.

 

5. सीड्स (Seeds) –
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवण्यासाठी सीड्स खूप चांगल्या मानल्या जातात. सीड्समध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. विशेषत: ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी आळशीच्या बिया खूप फायदेशीर मानल्या जातात. याशिवाय भोपळ्याच्या बिया, चिया सिड्स सुद्धा खूप चांगले मानले जाते.

 

6. आंबट फळे (Sour Fruits) –
अनेक आंबट फळांमध्ये गोडवा असूनही, संशोधन असे सांगते की ते ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करू शकतात. आंबट फळांमध्ये जीआय पातळी खूप कमी असते आणि ब्लड शुगरवर त्यांचा प्रभाव टरबूज आणि अननसापेक्षा खूपच कमी असतो.

 

7. सी फूड (Sea Food) –
प्रोटीन, गुड फॅट, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स सीफूडमध्ये आढळतात.
विशेषत: मासे आणि शेलफिशचे सेवन केल्यास ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवता येते.
याच्या सेवनाने अन्न खाल्ल्यानंतर ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते आणि त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते.

8. धान्य (Grain) –
धान्यांमध्ये भरपूर फायबर असते, जे ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
धान्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे ते ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत करते
आणि तुमचे पोट जास्त काळ भरलेले ठेवते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Pre-Diabetes Diet | pre diabetes diet foods to eat that lower risk of type 2 diabetes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Purandar Airport | विमानतळ ग्रस्तांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन; जमिनी न देण्यावर ठाम, ठरावही मंजूर

 

Gold Rate Today | सोन्याचे दर ‘जैसे थे’, तर चांदी महागली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

 

Pune Crime | कोथरुडमध्ये ATM मधून पैसे काढण्यास मदतीच्या बहाण्याने 76 वर्षाच्या ज्येष्ठाची फसवणूक