राज्यात पुढील २ दिवस ‘पूर्वमोसमी’ पावसाची शक्यता ; काही भागात उष्णतेची लाट कायम : हवामान विभाग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याच्या काही भागात तुरळक पाऊस पडला असला तरी पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातही राज्याच्या तापमानाचा पारा चढलेलाच राहील. दरम्यान, कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत हवामानात सकारात्मक बदल नोंदविण्यात येतील. त्यानुसार, मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. शिवाय राज्यातील काही भागांत येत्या २४ तासांत पावसाची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून घामाघूम करणाऱ्या उष्णतेपासून विदर्भातील काही भागांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भातल्या बहुतेक जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like