Pre Wedding Shoot | लोणावळ्यात प्री-वेडिंग शूट करणं पडलं माहागत, ड्रोन शुटिंग  चालकाला अटक

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नापूर्वी निसर्गाच्या सानिध्यात प्री-वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करण ही आजच्या जोडप्यांची नवीन फॅशनच बनली आहे. प्री-वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करण्यासाठी अनेक जोडपी लोणावळा (Lonavla) परिसरात येत असतात. मात्र, लोणावळ्यामध्ये एका ड्रोन चालकाला प्री-वेडिंग शूट करणे चांगलच महागात पडलं आहे. आयएनएस शिवाजी आणि एअरफोर्स स्टेशन परिसरात हे ड्रोन शूटिंग (Drone shooting) केल्याने ड्रोन मालकाला (drone owner Arrest) पोलिसांनी अटक केली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने या परिसरामध्ये ड्रोनच्या माध्यमातून शुटिंग करण्यास मनाई आहे.
कोणतेही शुटिंग करायचे असल्यास प्रशासनाकडून तशी परवानगी घ्यावी लागते. मात्र, विना परवाना प्री-वेडिंग शूट करणाऱ्या व्यंकटेश तेजस बोपन्ना Venkatesh Tejas Bopanna (वय-26) याला लोणावळा शहर पोलिसांनी (Lonavla city police) अटक केली आहे. या परिसरात ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग करत असल्याची माहिती या ठिकाणच्या कर्मचाऱ्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन बेड्या ठोकल्या. यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Fake Currency | नोटबंदी कुचकामी ! देशभरात बनावट नोटांचा सुळसुळाट; प. बंगाल, युपी, गुजरात आघाडीवर तर महाराष्ट्रातही Fake नोटांचे प्रकार वाढले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदल सेनेच INS शिवाजी (Navy INS Shivaji) हे प्रमुख संरक्षण प्रशिक्षण संस्था असून हे प्रतिबंधित क्षेत्र (Restricted area) आहे.
या ठिकाणी कोणतीही शूटिंग करण्यास बंदी आहे.
असे असताना व्यंकटेश हा त्या परिसरात ड्रोनच्या माध्यमातून प्री-वेडिंग शूट करत होता.
याच परिसरात एअर फोर्स स्टेशन (Air Force Station) देखील आहे.
ही बाब आयएनस शिवाजी येथील कर्मचारी अलोक मिश्रा (Alok Mishra) यांच्या लक्षात आली.
त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

वरिष्ठांनी तातडीने याची माहिती लोणावळा शहर पोलिसांना दिली. अलोक मिश्रा आणि इतर अधिकाऱ्यांनी ड्रोन चालकाचा शोध घेतला असता गेटच्या जवळच तो ड्रोनचा वापर करत असल्याचे दिसून आले. परंतु अधिकारी, कर्मचारी तिथे पोहचेपर्यंत तो पळून गेला.  त्यानंतर लोणावळा पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने प्री वेडिंग शूट करत असल्याचे सांगितले.

हे देखील वाचा

Narayan Rane | ’मी वेळ देत नाही, पण आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडेल’ – नारायण राणे

Pune Crime | पुण्याच्या रविवार पेठेत 1.20 कोटी रूपये किंमतीचे 3 किलो सोन्याचे दागिने भरदिवसा लांबविले, लहान मुलासह 2 महिलांचा प्रताप, जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pre wedding shoot in lonavla drone driver arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update