जर तुम्ही आज मुलांना शाळेत पाठवलं असेल तर कोणत्याही परिस्थितीत ध्यानात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सहा महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर सोमवारपासून देशात शाळा सुरू होत आहेत. कोरोना विषाणू साथीमुळे शाळा सहा महिन्यांहून अधिक काळ बंद ठेवाव्या लागल्या होत्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अनलॉक 4 अंतर्गत शाळा अर्धवट उघडण्यास परवानगी दिली आहे. तथापि, केवळ कंटेनमेंट झोनमध्ये नसलेल्या शाळांनाच उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रवेशादरम्यान मुले आणि कर्मचारी यांची तपासणी केली जाईल. योग्य शारीरिक अंतराचे पालन करण्यासोबतच मुलांना मास्क आणि पाण्याच्या बाटली व्यतिरिक्त सॅनिटायझर देखील घेऊन जावे लागेल. इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांसाठी शाळा बंद असतील आणि 9 वी ते 12 वी पर्यंतच्या मुलांना शिक्षण संबंधित सल्ल्यासाठी शाळेत जाण्याची परवानगी आहे.

अनलॉक 4 अंतर्गत फक्त पन्नास टक्के अध्यापन कर्मचार्‍यांनाच येण्याची परवानगी देण्यात आली आहे. केवळ 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश मिळू शकेल. दिल्ली सरकारने आपल्या शाळा बंद ठेवण्याचाच निर्णय घेतला आहे. मध्यवर्ती शाळांमधील मुलांच्या पालकांना शाळा उघडण्याची योजना पाठविली गेली आहे. मुलांना स्वेच्छेने शाळेत पाठवले जाऊ शकते. यासाठी कोणतीही सक्ती नाही. अकरावी आणि बारावीची मुले सोमवारी-मंगळवारी येऊ शकतात. दहावीची मुले बुधवारी आणि गुरुवारी शाळेत जाऊ शकतात. शुक्रवारी व शनिवारी नववीची मुले शाळेत जाऊ शकतात.

शाळेत कोणत्या गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक आहे :-
शाळेच्या आवारात कुणीही थुंकू शकत नाही. कुठेही थुंकण्यास पूर्णपणे मनाई आहे.
चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे, मुले त्यांच्याबरोबर मास्क घेऊन जातील.
एकमेकांमध्ये कमीतकमी सहा फुट अंतर ठेवणे आवश्यक आहे.
अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरद्वारे हँडवॉशिंग करावे लागेल. सॅनिटायझर स्वतःचे घेऊन जावे लागेल.
खोकला आणि शिंकताना नाक झाकणे बंधनकारक आहे.
अस्वस्थ वाटणे किंवा आजारासंबंधित काही जाणवल्यास अधिकारी किंवा शिक्षकांना याबाबत माहिती द्यावी लागेल.