‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’ म्हणत प्रेयसीला पाजले विष अन् स्वत: गेला पळून

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन – साथ जियेंगे, साथ मरेंगे असे म्हणत प्रेयसीला किटकनाशक पाजून स्वत:वर किटकनाशक पिण्याची वेळ आल्यानंतर तेथून पळून जाणाऱ्या भेकड प्रियकराला पोलिसांनी गजाआड केले आहे. या घटनेत प्रेयसी सुदैवाने बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या जबाबानंतर पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा दाखल करून अटक केली. फिलीप सुरेश गावित असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नवापुर तालुक्यातील नांदणगावातील १८ वर्षीय तरुणी शिक्षणानिमित्त नवापूरमध्ये ये-जा करीत होती. त्या दरम्यान फिलीपचे आणि तिचे प्रेमप्रकरण जुळले. मात्र, फिलिपला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करावे लागल्याने त्याने पहिले प्रेमप्रकरण संपवण्यासाठी पीडीत तरुणाला बोलावून घेतले. त्याने बोलावल्या प्रमाणे ती नवापूर शहरातील श्रीजी गेस्ट हाऊसजवळील जागेत दोघे एकत्र आले. त्याठीकाणी त्याने एकत्र आयुष्य संपवायचे असे सांगून अगोदर तिला विषारी औषध प्यायला दिले. साथ जियेंगे, साथ मरेंगे असे म्हणत त्याने तिला किटकनाशक औषध पाजले. तिला विषारी औषध पाजून स्वत: मात्र तेथून फरार झाला. हा प्रकार २६ जून रोजी घडला.

विषारी औषध प्राशन केल्याने पीडीत तरुणीला उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचारानंतर दोन दिवसांनी तरुणी शुद्धीवर आली. तिने पोलिसांकडे फिर्य़ाद दिल्यानंतर पोलिसांनी रविवारी (दि.७) रात्री गुन्हा दाखल करून प्रियकर फिलिपला अटक केली.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

 

You might also like