विमानतळावर राहिली अडीच कोटींची पेंटिंग, सफाई कामगाराला वाटला कचरा अन्…

पोलीसनामा ऑनलाईन : एक व्यावसायिक जर्मनीतील विमानतळावर फ्रेंच डॉक्टर आणि वैद्यकीय अभ्यासक यवेस टुंगूची एक महागडी पेंटींग विसरला. त्यानंतर जवळजवळ अडीच कोटीच्या या पेटिंगचे काय झाले हे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. विमानतळावरील सफाई कामगारांनी कचरा म्हणून ते डस्टबिनमध्ये फेकले. दरम्यान, ही किरकोळ पेंटींग नव्हती, त्याची किंमत सुमारे 2,50,71,022 रुपये होती.

दरम्यान, जेव्हा व्यापारी फ्रेंच सर्जन यवेस टोंगूच्या पेटिंगसह इस्त्राईलला उड्डाण करण्यासाठी डसेलडोर्फ विमानतळावर पोहोचला आणि विमानात चढला तेव्हा तो ती चेक-इन काउंटरवर विसरला. आपण पेटिंग घेतलेले नाही हे लक्षात येेईपर्यंत विमानाने उड्डाण केले होते. अत्यंत महागडी अशी ही पेंटिंग फ्लॅट कार्डबोर्ड बॉक्समध्ये पॅक केली होती. व्यापारी इस्त्राईलमध्ये पोचल्यावर त्याने पश्चिम जर्मनीतील डसेलडॉर्फ शहरातील पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी पेटींगशी संबंधित अनेक ईमेल पाठविले. बराच शोध घेतल्यानंतरही पेंटिंग कोठे सापडली नाही. त्याची किंमत अडीच कोटी असल्याने व्यापारी अस्वस्थ झाला. यानंतर व्यावसायिकाच्या पुतण्याने पेंटिंग शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. बेल्जियममधून प्रवास करून परत आल्यावर त्याने विमानतळाजवळील पोलिस स्टेशन गाठले आणि पेंटिंग हरवल्याची तक्रार दिली. पेंटिंग बरीच महाग असल्याने हे प्रकरण विमानतळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक मायकेल डिट्झ यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्याचा तपास सुरू केला.

त्यांनी विमानतळावरील स्वच्छता कंपनीशी संपर्क साधला आणि विमानतळाच्या आवारातील सर्व रीसायकलिंग कंटेनर स्वच्छ करण्यास सुरवात केली. पोलिस अधिकाऱ्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. विमानतळाच्या कागदाच्या कचऱ्याच्या कंटेनरचा कसून शोध घेत निरीक्षक मायकेल डिट्झ यांनी कचराकुंडीतून पेंटिंग परत मिळविली. थोड्या नुकसानीसह, जर्मन पोलिस ती वाचविण्यात यशस्वी झाले. दरम्यान, 1900 ते 1955 पर्यंत वास्तव्य करणारे यवेस टुंगू वैद्यकीय क्षेत्रात सुलभ ऑपरेशन आणि मेडिकल क्षेत्रात विदवत्तेसाठी ओळखले जात होते. त्यांच्या समकालीनांमध्ये साल्वाडोर डाली, जोन मिरी आणि मॅन रे हे त्यांना आवडत होते.