आगामी 5 दिवसात राज्यात ‘कमी-अधिक’ पाऊस !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहे तर हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यात काही ठिकाणी कमी-अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरीला मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातही तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , पुढील 5 दिवस राज्यात काही ठिकाणी कमी-अधिक पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीला 29-30 ऑगस्टला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सातारा आणि कोल्हापुरात घाट माथ्यावर आज जोरदार पाऊस पडू शकतो. पुण्यात 29 आणि 31 ऑगस्टला हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

विदर्भातही हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर अशा काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पुढील पाच दिवस तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –