मतदानावर पावसाचे ‘सावट’, प्रशासन चिंतेत तर उमेदवारांची ‘धाकधूक’ वाढली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकासांठी उद्या 21 ऑक्टोबरला एका टप्प्यात मतदान होणार आहे. अशातच राज्यातील बऱ्याच भागात येत्या 48 तासांत वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे यंदाच्या मतदानावर पावसाचे सावट असणार आहे. या पावसाचा परिणाम राज्यातील अनेक ठिकाणी मतदानावर होण्याची शक्यता आहे.

पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसाने पुन्हा जोर धरला आहे. सोमवारी होणाऱ्या मतदानावेळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानावर असलेल्या पावसाच्या सावटाने प्रशासनाची तसेच उमेदवारांची चिंता वाढवली आहे. ह्या निवडणुकीत उमेदवारांना प्रचार करण्यासाठी कमी कालावधी मिळाला असून त्यात मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे उमेदवारांचीही धाकधूक वाढली आहे.

पाऊस आणखी लांबणार
मुंबईसह कोकणातून परतीच्या मान्सुनचा प्रवास यंदा 14 दिवस उशिराने सुरु झाला आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आणखी वाढल्यास राज्यभरात पाऊसाचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता असून कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच बुधवारपर्यंत किमान हा पाऊस लांबणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.

visit : Policenama.com