Precision Dose in Pune | पुणे जिल्ह्यात 2 हजार 500 ज्येष्ठ नागरिकांनी घेतला ‘प्रिक्रॉशन डोस’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Precision Dose in Pune | दिवसेंदिवस कोरोनाचे (Coronavirus) संकट अधिकच गडद होत चालल्याचे दिसत आहे. त्यामुळे दोन्ही डोस वेळेवर घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना प्रिक्रॉशन (Precision Dose in Pune) डोस देण्याचेही सुरूवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि 60 वर्षावरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना डोस देण्यास 10 जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. यामध्ये पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 2500 ज्येष्ठ नागरिकांना लसीचे ‘प्रिक्रॉशन डोस’ देण्यात आले आहे.

 

पहिल्या दिवशी 3366 आरोग्य कर्मचारी आणि 774 अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी तिसरा डोस घेतला. दरम्यान, 10 जानेवारीपासून तिसऱ्या डोसला सुरुवात झाली आहे. दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी कोविन अँपवरून नोंदणी करून अथवा थेट लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) जाऊन लसीचा तिसरा डोस घ्यावा, असं आवाहन करण्यात आले आहे. (Precision Dose in Pune)

 

पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) 179 केंद्रांवर विशेष गटासाठी लसीकरणाचे नियोजन केले आहे. सुमारे 5 ते 6 हजारांपेक्षा जास्त लसींचा कोटाही तयार ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये पुणे शहरात (Pune City) पहिल्या दिवशी दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेले 387 आरोग्य कर्मचारी, 190 अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी 190 आणि 800 ज्येष्ठ नागरिकांनी तिसरा डोस घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 11 लाख 56 हजार 651 ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस, तर 9 लाख 36 हजार 849 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला. 3 ते 10 जानेवारी दरम्यान 15 ते 18 वयोगटातील 1 लाख 98 हजार 859 लाभार्थ्यांचे लसीकरण झालेय.

राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई (Dr. Sachin Desai) म्हणाले, ’60 वर्षांवरील सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक कोविन अँपवर नोंदणी करून किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन तिसरा डोस घेऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने डोस घ्यावा, असे नियमावलीत नमूद करण्यात आलेय. मात्र, डोस घेण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही. दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच तिसरा डोस दिला जाणार आहे.

 

Web Title :- Precision Dose in Pune | pune district 2500 senior citizens took precision dose covid 19 coronavirus

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन कायद्यानेच; ठाकरे सरकारचा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद

 

Pune Corporation Order | पुणे महापालिकेचे आदेश ! बांधकामे व कुलींग टॉवर्ससाठी प्रक्रिया केलेले मैलापाणी वापरणे बंधनकारक

 

कायदेशीर आदेशाचा बागुलबुवा उभा करून PMPML संचालकांनी स्वत:चे अपयश झाकले; संचालक मंडळाचा ‘तो’ निर्णय संशयाच्या भोवर्‍यात