Pregnancy Bible | करीना कपूर-खान विरोधात बीडमध्ये पोलिसांत तक्रार दाखल

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – गरोदरपणातील अनुभव आणि महिती देणारे एक पुस्तक (Pregnancy Bible) बॉलिवुड अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) हिने लिहिले असून हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले. आपल्या पुस्तकाला करीनाने (kareena kapoor) प्रेग्नसी बायबल (Pregnancy Bible) असे नाव दिल्याने आता नवीन वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी करीनाविरूद्ध बीडमध्ये (Beed) अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने (Alpha Omega Christian Mahasangh beed) तक्रार दाखल केली आहे.

करीना कपूरने ’प्रेग्नसी बायबल’ (Pregnancy Bible) या आपल्या पुस्तकाच्या नावात बायबल शब्द वापरल्याने बीडमधील अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने (Alpha Omega Christian Mahasangh beed) आक्षेप घेतला आहे. पुस्तकावर बायबल शब्द वापरल्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या असून तो शब्द तात्काळ हटवावा, अशी मागणी ख्रिश्चन महासंघाने केली आहे.

बीडच्या (Beed) शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये (Shivajinagar Police Station) अल्फा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीवर अद्याप करीना कपूर किंवा पुस्तकाच्या प्रकाशकांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, याप्रकरणी रितसर गुन्हा दाखल करावा,
अशी मागणी ख्रिश्चन महासंघाने केली आहे.

Web Titel :- Pregnancy Bible | beed police complaint filed against kareena kapoor in beed over book title

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ ! FB पोस्ट टाकत पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या

Pune Crime | मुंबईला जाण्यासाठी बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून; पुणे स्टेशन परिसरातील घटना, प्रचंड खळबळ