गरोदरपणात केस गळतात ? ‘अशी’ घ्या काळजी ! जाणून घ्या ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गरोदरपणात महिलेत अनेक प्रकारचे बदल होत असतात. काही महिला या काळात केसगळतीनं परेशान असतात. या दिवसात केसांची काळजी कशी घ्यावी याची आपण माहिती घेणार आहोत.

अशी घ्या केसांची काळजी
1) या काळात शक्यतो हेअर स्टाईल आणि हेअर स्प्रे यांचा वापर टाळावा.

2) केसांना रंग देणं, हायलाईट्स करणं, केसांवर निरनिराळ्या ट्रीटमेंट करणं बंद करावं.

3) केसांसाठी नैसर्गिक पर्यायांचा वापर करावा.

4) गर्भधारणे दरम्यान किवा नंतरच्या काळात मिनोऑक्सिडिअल हेअर ट्रीटमेंटचा वापर करू नये.

5) केस रंगवण्यासाठी रसायनांचा वापर न करता नैसर्गिक रंगाचा पर्याय निवडा.

6) केसांची निगा राखण्यासाठी संतुलित आहार घ्या. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

7) ओले केस विंचरू नका.

8) केस घट्ट बांधू नका.

9) केसांची स्वच्छता राखा.

केसांच्या समस्या टाळण्यासाठी घरगुती उपाय पुढीलप्रमाणे –
1) जर केस गळत असतील तर 4 ते 5 चमचे ॲलोव्हेरा जेल (कोरफडीचा गर), दोन चमचे एरंडेल तेल आणि एक चमचा ग्लिसरीन हे मिश्रण एकत्र करून ते डोक्याच्या टाळूपासून केसांच्या शेंड्यापर्यंत लावावं. त्यानंतर एक तासानं केस स्वच्छ धुवावेत. यामुळं केस मजबूत होतात आणि त्यांची चमक वाढते.

2) मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. त्याची पेस्ट करा आणि आपल्या केसांवर लावा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा. त्यामुळं केस वाढतात.

3) कढीपत्त्याची पानं नारळ तेलात उकळा आणि थंड होऊ द्या. हे मिश्रण केस धुण्यापूर्वी 1 ते 3 तास आधी वापरा.

4) आपल्या आवडीच्या तेलात एक ते दोन थेंब तिळाचं तेल मिक्स करा आणि केस धुण्यापूर्वी टाळूवर मालिश करा. विविध तेलात विविध प्रकारचे गुणधर्म असतात. केसांच्या वाढीसाठी लव्हेंडर ऑईल चांगलं असतं. केस दाट होण्यासाठी रोझमरी तेलाचा वापर करा.

5) योग्य दिनचर्या, संतुलित आहार आणि दैनंदिन व्यायामानं गरोदरपणात तसंच प्रसूतीनंतर त्वचा आणि केसांचं आरोग्य उत्तम ठेवलं जाऊ शकतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.